आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिपू सुलतान जयंतीची बेकायदा मिरवणूक रोखली, तीन पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- टिपू सुलतान जयंतीनिमित्त कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, तरीही त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्याचा प्रयत्न झाला. कोतवाली पोलिसांनी हस्तक्षेप करत मिरवणूक रोखली प्रतिष्ठानच्या तिघाजणांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक सोमनाथ मालकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये सामाजिक बहुद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक सय्यदशहा फैसल कुराण (आशा चौक), शहानवाज फय्याज शेख (शिवाजीनगर, कल्याण रस्ता) अजिन नूरमोहंमद राजे यांचा समावेश आहे. टिपू सुलतान जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यासाठी प्रतिष्ठानने परवानगी मागितली होती. परंतु कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मिरवणुकीऐवजी इतर सामाजिक कार्यक्रम घेण्याची विनंती पोलिसांनी केली होती. पण परवानगी नाकारून प्रतिष्ठानने मिरवणुकीची तयारी केली.

गेल्या वर्षी रामनवमीला पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. तरीही मिरवणूक काढण्यात आल्यामुळे दंगल उसळली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता कोतवाली पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी पुतळ्यापासून मिरवणूक निघत असतानाच पोलिसांनी हस्तक्षेप केला. मिरवणुकीला मज्जाव करुन पोलिसांनी तिघाजणांना ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक मालकर, सहायक निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक गजानन करेवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.