आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथी हत्या टाळण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग रहावे, स्मिता पानसरे यांचे आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - डॉ.नरेंद्र दाभाेलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे एम. एम. कलबुर्गी यांच्यानंतर आता चौथी हत्या होणार नाही यासाठी सर्व परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येऊन सजग रहावे, असे आवाहन कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कन्या स्मिता पानसऱ्यांनी केले.

येथील सत्यशोध मानवसेवा संस्थेने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. सुवर्णा होले होत्या. पानसरे म्हणाल्या, देशात जातीय धर्मांध शक्ती सक्रिय झाल्या, ही चिंतेची बाब आहे. परिवर्तनवादी प्रतिगामी या शक्तींमध्ये आता आडवी सीमारेषा रेखाटली गेली आहे. आपण कोणत्या बाजूने आहोत हे प्रत्येकाने तपासून पाहावे. दाभोलकर, पानसरे यांचे खुनी सापडत नव्हते हे खरे नाही. खुनी कोण आहे हे सरकारला माहीत होते. मात्र, त्यांना ते पकडू शकत नव्हते ही वस्तुस्थिती आहे. पुरोगामी चळवळीतील तीन नेत्यांच्या हत्या झाल्या. आता चौथी हत्या टाळण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग राहून प्रतिगाम्यांवर दबाव वाढवला पाहिजे. पानसरे यांच्या आधी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी दलितांसाठी केलेले कार्य सांगितले. सूत्रसंचालन प्रा. तुषार शिंदे टिळक भोस यांनी केले. मुकुंद सोनटक्के यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अॅड. संभाजी बोरुडे, स्मिता तरटे, अनुराधा ठवाळ, प्रवीण शेलार आदींनी परिश्रम घेतले.

महात्मा गांधींच्या देशात नथुरामाचे मंदिर कसे?
पंतप्रधाननरेंद्र मोदी विदेशात गेल्यावर भारत हा गौतम बुद्ध महात्मा गांधींच्या अहिंसावादी विचारांचा देश असल्याचे वारंवार सांगतात. मग महात्मा गांधींच्या देशात त्यांच्या मारेकऱ्यांचे मंदिर कसे उभारले जाते? नथुरामाला फाशी दिलेला दिवस शौर्य दिन म्हणून साजरा कसा होतो. हे मोदींना मान्य आहे का? असा सवाल पानसरे यांनी यावेळी बोलताना केला.