आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी उपाययोजनांसाठी सतर्क राहा - आमदार मुरकुटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - सध्याकमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला असला, तरी अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवावे. भविष्यातील उपाययोजनासाठी सतर्क रहावे, अशी सूचना आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली.

पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळी उपाययोजनांसाठी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी आमदार मुरकुटे बोलत होते. या बैठकीला तहसीलदार हेमा बडे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सहायक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, पंचायत समिती सदस्य जानकीराम डौले, जनार्दन जाधव उपस्थित होते.

तालुक्यात ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहेत, तेथे आणखी उपाययोजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. आमदार मुरकुटे म्हणाले, रब्बीसाठी या पावसाचा उपयोग होणार आहे. पाणी पातळी वाढवण्यासाठी काही अंशी मदत होईल. मात्र, मोठा पाऊस सर्वांना अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांनी पाऊस झाला, म्हणून टंचाई स्थिती कमी झाली असे समजू नये. पाणी जमिनीत जिरवण्यासाठी मोठे काम करावे लागेल. २५ सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ग्रामसभांमध्ये तलाठी, ग्रामसेवकांनी टंचाई कामांवर भर द्यावा. जलआराखड्यासंदर्भात हरकती अर्ज दाखल करा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.