आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Solve Water Problems Coordination And Consistency Is Important

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी समन्वय व सामंजस्य आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांतील पाण्याचे खरोखरच समान वाटप व्हावे, गोदावरीच्या पाण्याशी संबंध असलेल्या नगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील लाभार्थ्यांत समन्वय व सामंजस्य निर्माण व्हावे, एकमेकांच्या गरजा व अडचणी चांगल्या प्रकारे समजून घ्याव्यात यासाठी जानेवारीच्या ितसऱ्या आठवड्यात सिंचन सहयोग परिषद होणार असल्याची माहिती ज्येष्ठ जलतज्ज्ञ व ‘सिंचन सहयोग’चे प्रमुख मार्गदर्शक डॉ. माधवराव चितळे यांनी सोमवारी दिली.
तिन्ही जिल्ह्यंात सिंचन सहयोग सामजिक संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. नगरच्या सिंचन सहयोगची सोमवारी पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवनात बैठक झाली. यावेळी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता अ. दा. कोकाटे, कार्यकारी अभियंता विजय थोरात, निवृत्त अिभयंता चंद्रशेखर करवंदे, निवृत्त कार्यकारी अभियंता जयप्रकाश संचेती, निवृत्त उपअभियंता एस. डी. गाढवे, प्रा. बी. एन. शिंदे, प्रा. सीताराम काकडे, डॉ. सुधा कांकरिया, सुरेश संत उपस्थित होते.

या बैठकीत पाण्याचा प्रश्न, त्याची पार्श्वभूमी, हा प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याबद्दल सविस्तर चर्चा झाली. कोकणात वाहून जाणारे वळवण्यावर जोर देण्यात आला. चितळे म्हणाले, पाण्याची परिस्थिती दरवर्षी बदलत असते. त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनात वेगळे कौशल्य वापरावे लागते. आपल्याकडे उपलब्ध पाणी व जमीन यांचे प्रमाण विषम आहे. पाणी खूप कमी व जमीन जास्त आहे. ‘गोदावरी’चे ८० टक्के पाणी शेतासाठी वापरले जाते. नागरी किंवा औद्योगिक पाण्याचे प्रश्न त्यानंतर येतात. गोदावरीशी संबंधित तिन्ही जिल्ह्यांतील लोकांत सामंजस्य व समन्वयाची गरज आहे. सामंजस्य व समन्वयाचा गाभा दुसऱ्याची गरज आधी समजून घेणे, हा आहे. ते निर्माण होणे, हेच सिंचन सहयोगाचे उद्दिष्ट आहे. प्रश्न सोडवण्यासाठी कायद्याचा आधार घ्यायचा, पण कायद्याचा किस पाडायचा नाही, हे सिंचन सहयोगाचे धोरण आहे. प्रश्न दरवर्षी निर्माण होणार आहे. त्यामुळे सिंचन सहयोगाच्या दरवर्षी बैठका घेऊन हा प्रश्न सो़डवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंचन सहयोगच्या सदस्यांकडून पाच विषयांवर ५ जानेवारीपूर्वी लेख मागवण्यात आले आहेत. निसर्गातील पाण्याचा हिशेब नीट मांडणे, पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी झालेले मानवी प्रयत्न, सध्या पाण्याचा जो वापर होतो तो राज्याच्या जलनीतिनुसार होतो का?, सिंचनाच्या कायद्यात काही सुधारणा हवी आहे का?, समतोल विकासाचे धोरण राबवताना गोदावरीच्या पाणीवाटपात किती समतोलपणा आहे? या विषयावर हे लेख असतील.