आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगायची आहे खड्डय़ांमध्ये अडकलेल्या जनतेची कहाणी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - खड्डय़ांमध्ये अडकलेली ही जनता बिचारी
उतरलेले डांबर, सुकलेली खडी
रोजचेच आहे सारे काही आजच नाही
माफी कशी मागू घरी, खड्डे आहेत भारी
सांगायचे आहे आमच्या प्रशासनाला
दमलेल्या जनतेची ही कहाणी त्यांना..
या कवितेचा जन्म झाला इयत्ता पाचवीत शिकणार्‍या एका मुलीच्या संवेदनशीलतेतून. नगर-कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगरमध्ये राहणारी रोशनी संजय खरे तारकपूरमधील सेंट विवेकानंद शाळेत शिकते. शाळेत येताना-जाताना तिला लालटाकी-दिल्लीगेट-नालेगाव रस्त्यावरून जावे लागते. रस्त्यांवरील खड्डय़ांत गाडी आदळली की शारीरिक वेदनांबरोबरच तिचे मनही कळवळते. सोमवारी (22 जुलै) शाळेतून घरी जाताना खड्डय़ात गाडी आदळून तिला बराच त्रास झाला. घरी गेल्यावर रडतच तिने हे सगळं आईला सांगितलं. आई म्हणाली, ‘कोमेजून निजलेली एक परीराणी, उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी..’ आईला उत्तर देताना रोशनी म्हणाली, ‘रस्त्यावर खड्डे आहेत भारी, अडकली त्यात आमची गाडी, आता काही विचारू नको, दे मला आधी चहा-खारी..’

खड्डय़ांच्या व्यथेतून मग खरे कुटुंबाने ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या कवितेच्या धर्तीवर एक गाणेच तयार केले.
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम जनता करी ही खड्डय़ांची वारी
रोजच सकाळी जनता निघताना सांगी
खड्डे चुकवत येईन मी घरी..
स्वप्नातल्या रस्त्यावर मारू मग फेरी
खर्‍याखुर्‍या रस्त्यांची घेऊ थोडी गोडी
सांगायचे आहे आमच्या प्रशासनाला
दमलेल्या जनतेची ही कहाणी त्यांना..
तासन्तास जातो खड्डय़ांचा विचार करून
एक एक खड्डा जातो डोळ्यासमोरून
वाटे खड्डय़ामध्ये एक एक खडे टाकावे
अन् उगाचच रूसावे नि भांडावे प्रशासनाशीजरी होतो त्रास जनतेला
तरी मत देतो आम्ही तुम्हाला
पैशांसाठी नका करून रस्ता बेकार

नका घेऊ उगाच खड्डय़ांचा कैवार..
आमच्या मनातून खड्डा कधी हटेल का?
रस्त्यांवरून चालताना गंमत वाटेल का?
दिवसा दिसणारे खड्डे रात्रीही येतात स्वप्नात
सांगा सांगा हे खड्डे कायमचे बुजतील का..
ही कविता वाचून महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन खड्डय़ांकडे लक्ष देतील असा भाबडा विश्वास रोशनी आणि तिच्या आई-वडिलांना वाटतो आहे. अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नगरकरांच्या स्वास्थ्यासाठी खड्डे बुजवण्याची मागणी त्यांनी केली आहे.