आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून ‘104 माय एफएम’चे प्रसारण, नगरकरांच्या कानांनाही मिळणार नवीन अनुभूती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - संपूर्णभारतात नावीन्यपूर्ण शैलीमुळे लोकप्रिय झालेले १०४ माय एफएम रेडिओ चॅनल साेमवार, १२ डिसेंबरपासून अहमदनगरकरांच्या सेवेत रुजू होत आहे.
मध्य प्रदेश, झारखंड, पंजाब आणि राजस्थानमध्ये असलेले हे चॅनल आता सर्वात मोठे खासगी चॅनल म्हणून दाखल झाले आहे. औरंगाबाद, अहमदनगर, सांगली आणि नांदेड शहरात एकाच वेळी हे चॅनल सुरू झाले आहे. धुळे, सोलापूर, अकोला आणि नाशिकच्या रसिकांनाही लवकरच या चॅनलचा आनंद घेता येणार आहे.

अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, त्यांना महाराष्ट्रातील दोन तरुण, प्रतिभावंत गायक आणि संगीत दिग्दर्शक स्वप्निल बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी निवडलेली गाणी ऐकण्यास मिळणार आहेत.

हजारो गाण्यांमधून निवडलेली ही गाणी अहमदनगरचे रसिक ऐकणार आहेत. शिवाय वेळोवेळी या दोघांकडून गाण्यांमध्ये बदलही करण्यात येणार आहेत. विनोदी कार्यक्रम, संगीताची पर्वणी, महिलांसाठी वेगळे कार्यक्रम, आपल्या शहराची इत्थंभूत माहिती, जागतिक घडामोडी, देश विदेशातील गोष्टी याचबरोबर मित्र वाटावेत असे आरजे अभय, आरजे सत्या आणि आरजे गायत्री आपल्यासोबत एखाद्या जिवश्च कंठश्च मित्रासारखे गप्पाही मारणार आहेत. आणि त्यांच्या बरोबरीने असणार आहे त्या संगीताची मेजवानी जी आबालवृद्धांना आवडणारी असेल. कारण आपल्या संगीताने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गायक, संगीतकार स्वप्निल आणि अवधूत यांनी गाण्यांची निवड करताना आपला अनुभव पणाला लावलाय.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेले अनुभव, गाण्यांचा आणि रसिकांच्या आवडीचा अंदाज यातून त्यांनी अहमदनगरकरांसाठी विशेष अशी गाणी निवडली आहेत. रसिकांच्या मनाचा अचूक अंदाज बांधणारी ही गाणी अाणि साेबत विविध कार्यक्रम नगरकरांच्या पसंतीस उतरतीलच, असा विश्वास १०४ माय एफएमचे प्रमुख हरीश भाटिया यांनी व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...