आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौर आज राजीनामा देणार ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आमदार तथा महापौर संग्राम जगताप बुधवारी (२७ मे) होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खरेच राजीनामा देणार का, याबाबत विराेधकांसह सत्ताधारी नगरसेवकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांच्या राजीनाम्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मनपाच्या सर्वसाधारण सभेत जगताप राजीनाम देणार आहेत, असे त्यांच्या निकटवर्तीय कार्यकत्यांनी मागील आठवड्यात स्पष्ट केले. त्यामुळे राजीनाम्याबाबत शहरातील चौकाचाैकांत उलटसुलट चर्चा सुरू आहे. विरोधी सत्ताधारी नगरसेवक तर रिक्त होणाऱ्या महापौरपदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
मनसेसह अपक्षांची साथ मिळवत जगताप यांनी डिसेंबर २०१४ मध्ये महापालिकेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. विधानसभा निवडणूक लढवताना जगताप यांनी काही नगरसेवकांना महापौरपदाचा शब्द दिला होता. परंतु निवडून आल्यानंतर शब्द फिरवत महापौरपदाच्या राजीनाम्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. वरिष्ठांनी आदेश दिला, तर आपण राजीनामा देऊ, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे महापौरपदाचा शब्द मिळालेले काही नगरसेवक नाराज झाले. त्यात नगरसेवक अभिषेक कळमकर यांचे नाव अग्रस्थानी होते. अभिषेक कळमकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांचे पुतणे आहेत. शिवाय दादांचे पक्षात चांगले वजन अाहे. हे वजन वापरून त्यांनी जगताप यांच्या महापौरपदाच्या राजीनाम्यासाठी फिल्डींग लावली. असे असले, तरी पक्ष पातळीवरून राजीनामा देण्याबाबत अद्याप कोणतेच आदेश नाहीत, केवळ दिलेला शब्द पाळण्यासाठी जगताप राजीनामा देत असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. यावरून जगताप राजीनामा देणार हे स्पष्ट झाले असले, तरी ऐनवेळी त्यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जगताप यांनी कोणताही महत्त्वाचा अजेंडा नसताना बुधवारी दुपारी वाजता सर्वसाधारण सभा बोलावली आहे. विशेष म्हणजे मनपाच्या सभागृहाचे काम सुरू असल्यामुळे ही सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होणार आहे. या सभेकडे सर्व नगरसेवकांसह नगरकरांचे लक्ष लागले आहे.
कोण होणार महापौर
जगताप हे महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त प्रसिध्द होताच सोशल मीडियावर जगताप यांच्यानंतर महापौर कोण अशा पोस्ट पडण्यास सुरू झाल्या. जगताप यांनी बुधवारी राजीनामा दिल्यास या पोस्ट आणखी काही दिवस सुरूच राहतील. महापौरपदासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया, तसेच चौकाचाैकात सुरू असलेली महापौरपदाची चर्चा आणखी रंगणार आहे.
बातम्या आणखी आहेत...