आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज संगमनेर बंदची हाक, थोरात यांच्या नेतृत्वाखाली झाला बैठकीत निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - समन्यायी पाणीवाटप कायद्याचा चुकीचा अर्थ काढून पिण्याच्या नावाखाली जास्तीचे पाणी सोडले जात असल्याचा आरोप करत या विरोधात ज्येष्ठ काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी (३ नोव्हेंबर) संगमनेर तालुका बंदचा निर्णय जाहीर केला..
जायकवाडीसाठी नगर जिल्ह्यातील मुळा, निळवंडे, भंडारदरा धरणातून रविवारी रात्री पाणी सोडले गेले. नाशिमध्ये याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे नगरचे पाणी मात्र जायकवाडीकडे झेपावले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळीच काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत तालुक्यातील काँगेसच्या नेत्यांची बैठक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात झाली. यावेळी तालुक्यातून करण्यात येणाऱ्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...