आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Starts Ahmednagar Mahakarandak Competition

अहमदनगर महाकरंडक स्पर्धेचा आजपासून फीवर, सोनाली कुलकर्णीच्या हस्ते होणार उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बहुप्रतीक्षित 'अहमदनगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट महावीर प्रतिष्ठानच्या वतीने सावेडीतील माउली सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २७ एकांकिका सादर होत आहेत. सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते दुपारी वाजता स्पर्धेचे उद्घाटन हाेईल. यावेळी दिग्दर्शक सुजय डहाके, अभिनेत्री केतकी माटेगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील, अशी माहिती नरेंद्र फिरोदिया स्वप्नील मुनोत यांनी दिली.

ही राज्यस्तरीय स्पर्धा मराठी एकांकिकांसाठी मर्यादित असून महाराष्ट्रातील हौशी नाट्य संस्था महाविद्यालयांसाठी खुली आहे. रंगभूमीवरील हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. उद्घाटन सोहळ्याला अामदार संग्राम जगताप महापौर अभिषेक कळमकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. २४ जानेवारीला अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे, अशी माहिती महावीर प्रतिष्ठानचे हर्षल बोरा यांनी दिली.

स्पर्धेसाठी भरघोस रकमेची पारिताेषिके ठेवण्यात आली आहेत. सांघिक प्रथम एकांकिकेला अहमदनगर महाकरंडकासह ६१ हजार १११ रुपये प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला ४१ हजार १११ रुपये, करंडक प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला २१ हजार १११ रुपये, करंडक प्रमाणपत्र, चतुर्थला ११ हजार १११ रुपये, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ हजार १११ रुपये, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिकेला ११ हजार १११ रुपये, करंडक प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यावर्षी नगरच्या संघासाठी विशेष पारितोषिक दिले जाणार आहे.

वैयक्तिक पारितोषिके या प्रमाणे - दिग्दर्शन प्रथम - हजार १११ रुपये, द्वितीय - हजार १११ रुपये, तृतीय - ७११ रुपये, उत्तेजनार्थ - ३११ रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, अभिनेता अभिनेत्री प्रथम - हजार १११ रुपये, द्वितीय - ७११ रुपये, तृतीय - ५११ रुपये, उत्तेजनार्थ - ३११ रुपये, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र. सहअभिनेता सहअभिनेत्री, खलनायक, खलनायिका, विनोदी कलाकार, बाल कलाकार, प्रकाश योजना, संगीत, नेपथ्य, रंगभूषा, वेषभूषा, लेखन अशी विविध प्रकारची रोख पारितोषिके, सन्मानचिन्हे प्रमाणपत्रांसह दिली जाणार आहेत. स्पर्धेचे परीक्षक म्हणून दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री हेमांगी कवी एबीपी माझाचे प्रतिनिधी अमित भंडारी हे काम पाहणार आहेत.

'मांजा'ने होईल श्रीगणेशा
नानासाहेब इन्स्टिट्यूटच्या 'मांजा' या एकांकिकेने स्पर्धेला सुरुवात होईल. गुरुवारी पाझर (नाट्यवाडा, औरंगाबाद), रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग (नाट्यरंग, अौरंगाबाद), खेळ मांडला (अहमदनगर कॉलेज), देवदासी (नाट्यशास्त्र विभाग, बामु, औरंगाबाद), ड्रायव्हर (निर्मिती रंगमंच, नगर), भक्षक (नाट्यशास्त्र विभाग, बामु, औरंगाबाद), पाणी रे पाणी (हर्ष अकादमी, सांगली) या एकांकिका सादर होतील. सकाळी १० ते रात्री पर्यंत या एकांकिका सुरू राहणार आहेत. नगरकरांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शुक्रवारी परीविक्षा (आकांक्षा बालरंगभूमी, पुणे), मुखवटे (मैत्री कलामंच, मुंबई), फोटू (मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय, पुणे), मे वारी जावा (दिशा थिएटर्स, मुंबई), सेल्फी (अभिनय, कल्याण), संगीत बायकोची मैत्रीण (मोरया, पुणे), रक्तोत्सव (संघर्ष युवा प्रतिष्ठान, नगर), टप्पा (रंगसाधना अकादमी, नगर) या एकांकिका सादर होतील. शनिवारी प्रतिगांधी (व्यक्ती, पुणे), दुनिया गेली तेल लावत (समर्थ क्रिएशन्स, पुणे), उदकशांत (यतीन क्रिएशन्स, पुणे), एकूट समूह (संक्रमण, पुणे), अफू (स्पंदन, नाशिक), बत्ताशी (एमडी कॉलेज, मुंबई), तो पाऊस आणि टाफेटा (अश्व थिएटर, मुंबई), मित्तर (फोर्थ वॉल, मुंबई) या एकांकिका सादर होतील.

रविवारी बक्षीस वितरण
स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी रंगीत सावल्या (कोलाज क्रिएशन, पुणे), दृष्टी (झीरो बजेट प्रोडक्शन, मुंबई) पिकनिक (अनुभूती, मुंबई) या तीन एकांकिका सादर होतील. त्यानंतर दुपारी तीन ते साडेचार या वेळेत कार्यशाळा होणार आहे. यामध्ये प्रमुख पाहुणे परीक्षक उपस्थित कलाकारांना, तसेच रसिकांना नाट्यकलेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता अभिनेता भरत जाधव यांच्या हस्ते पारिताेषिक वितरण होईल, अशी माहिती संयोजकांच्यावतीने बुधवारी देण्यात आली.