आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज निवडणूक: किंगमेकर मनसेची भूमिका गुलदस्त्यात, युती-आघाडीचा दावा कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नव्या महापौरांची निवड काही तासांवर येऊन ठेपली असताना "महापौर आमचाच' हा युती आघाडीचा दावा कायम आहे. महापौरपदासाठी सोमवारी ( जून) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मतदान होणार आहे. युती आघाडीने नगरसेवकांची पळवापळवी करत महापौरपदावर दावा केला आहे. दरम्यान, किंगमेकर ठरणाऱ्या मनसे नगरसेवकांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे महापौरपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी २७ मे रोजी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना-भाजपने महापौरपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. राष्ट्रवादीसह काँग्रेस काही अपक्ष नगरसेवक फोडण्यात त्यांना यश मिळाले. आघाडीनेदेखील पूर्वीचे संख्याबळ कायम ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. युती, आघाडीच्या या सत्तेच्या सारिपाटाकडे नगरकर लक्ष ठेवून आहेत.
महापौरपदासाठी युतीचे सचिन जाधव आघाडीचे अभिषेक कळमकर निवडणूक रिंगणात आहेत. दोघांपैकी महापौराच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मतदान होईल. सहलीला गेलेले नगरसेवक अद्याप परतलेले नाहीत. रविवारी रात्री उशिरा अथवा सोमवारी सकाळी हे नगरसेवक सहलीहून परततील. सभेत कोण कुणाच्या बाजूने मतदान करणार, अथवा कोण अनुपस्थित राहणार, यावरच महापौरपदाची निवड अवलंबून आहे.
या निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक किंगमेकर ठरणार आहेत. युतीचे उमेदवार जाधव यांनाच मतदान करावे, असे पक्षादेश मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांनी गटनेते गणेश भोसले यांना दिले आहेत. परंतु भोसले यांनी हे आदेश मिळालेच नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मनसे नगरसेवक काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे गटनेते संदीप कोतकर यांनी त्यांच्या नगरसेवकांना कळमकर यांना मतदान करण्याचा व्हीप बजावला आहे. त्यामुळे आघाडीतील धुसफूस थांबल्याचे स्पष्ट झाले. युतीच्या गटात गेलेले राष्ट्रवादी, काँग्रेस काही अपक्ष नगरसेवकही ऐनवेळी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मनसे पदाधिकाऱ्यांनी चिकटवले पक्षादेश...
बातम्या आणखी आहेत...