आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण पत्रकार कार्यशाळेचे आज उद्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले पुणे येथील पत्र सूचना कार्यालयातर्फे रविवारी (३ जानेवारी) शहरातील हॉटेल उदयनराजे पॅलेस येथे पत्रकारांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, पत्र सूचना कार्यालयाच्या संचालक अल्पना संत शर्मा उपस्थित राहणार आहेत.