आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज म्हणाले- पवारच दोषी तर पवारांचा पलटवार- राजला महत्त्व देत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काय बोलावे, काय बोलू नये हा त्यांचा प्रश्न आहे. राज जे काही बोलतात त्यांना मी जराही महत्त्व देत नाही. माझ्या नावाचा फायदा घेऊन लोक प्रसिद्धी मिळवतात, असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना उद्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार देण्याला काही संघटना आणि व्यक्तींनी विरोध केला आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले होते, की शरद पवार जातीचे राजकारण करीत आहेत. एका विशिष्ट जातीचा व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याने शरद पवार यांना पोटशुळ उठला आहे.
यावर शरद पवार म्हणाले, की राज ठाकरे यांच्या वक्तव्याला मी जराही महत्त्व देत नाही. त्यांनी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे. पुरंदरे यांच्याबाबत सध्या जो काही वाद सुरु आहे त्यावर पडदा पाडण्याची वेळ आली आहे. आता हा वाद संपायला हवा.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा...
नेमाडे म्हणजे साहित्यातील दहशतवादीच -म्हणाले विश्वास पाटील
ब्राह्मण शब्द वापरणाऱ्यांच्या संकुचित वृत्तीची किव येते -जितेंद्र आव्हाड
राकाँ आणि भाजपनेच रचले महाराष्‍ट्र भूषण वादाचे कुभांड - राज ठाकरे
गृहराज्यमंत्री राम शिंदेंच्‍या घरावर संभाजी बिग्रेडची दगडफेक
आणि इतर ताज्या घडामोडी....