आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today's Star ICU's Ingratiation By Guardian Minister

आधुनिक ‘स्टार आयसीयू’चे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अनभुलेज स्टार आयसीयू, स्पेशालिटी जनरल केअरमधील सुसज्ज यंत्रणा.)
नगर - सर्वआधुनिक वैद्यकीय सेवा एकाच छत्राखाली उपलब्ध असलेल्या अनभुलेज स्टार आयसीयू, स्पेशालिटी जनरल केअरचे उद्घाटन शनिवारी (४ जुलै) पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मार्केटिंग डायरेक्टर डॉ. रणजित सत्रे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रेमदान चौकातील या सेंटरमधील ग्लोबस एमआरआयचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप, अतिदक्षता विभागाचे उद्घाटन डॉ. संजीव मंगळूरकर, लिथोट्रिप्सी (मूतखड्यावरील शस्त्रक्रिया) विभागाचे उद्घाटन महापौर अभिषेक कळमकर, तर जनरल वॉर्डचे उद्घाटन डॉ. दिलीप भोगे यांच्या हस्ते होणार आहे.

एकाच छत्राखाली ७५ बेडच्या या हॉस्पिटलमध्ये २० बेडचे वातानुकूलित आयसीयू आहे. एमआरआय, मधुमेह उपचार, हृदयविकार, दमा, मूत्रपिंड विकार उपचार, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण या प्रमुख वैद्यकीय सेवांसह नगरमध्ये प्रथमच वातविकारांवर उपचारांचीही सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. अनभुले हॉस्पिटलमध्ये या आधीच मेंदू विकारावर उपचार शस्त्रक्रियांची सेवा उपलब्ध आहे. निदान करण्यासाठी सर्व आवश्यक ती अत्याधुनिक यंत्रसामग्री येथे बसवण्यात आली असल्याची माहिती मेडिकल डायरेक्टर डॉ. गोपाल बहुरूपी यांनी दिली.

व्यवस्थापकीय संचालक डॉ. भूषण अनभुले म्हणाले, पूर्ण पारदर्शकता हे येथील वैशिष्ट्य असेल. याशिवाय प्रमुख आरोग्य विमा कंपन्यांशी ‘स्टार’ची संलग्नता असल्याने रुग्णांना कॅशलेस सुविधेचा लाभ मिळेल. याशिवाय श्रीमंत रुग्णांनी बरे झाल्यावर हॉस्पिटलला दान म्हणून दिलेल्या औषधांची बँक तयार करून त्याचा लाभ गरीब रुग्णांना देण्याची योजना आहे.

डॉ. बहुरुपी डॉ. सुधीर बोरकर हे दोन फिजिशियन कायमस्वरूपी स्टार आयसीयूत उपलब्ध असतील. स्टार आयसीयू हे शहरातील एकमेव सेंटर असेल, जेथे एकाच छत्राखाली अल्ट्रा सोनोग्राफी, सीटी स्कॅन, लिथोट्रिप्सी, आयसीयू, ओपीडी स्पेशालिटी आणि जनरल केअर युनिट, वंध्यत्व निवारण गर्भाशयाच्या बीजांडाच्या सर्व आजारांवर लॅप्रोस्कोपिक सर्जरी, तसेच ब्रेन स्पाईन सर्जरी अॅडव्हान्स आय केअर उपलब्ध होणार असल्याची माहिती डॉ. अनभुले यांनी यावेळी दिली.