आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खंडणीसाठीच पारगमन नाक्याची तोडफोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील विविध संघटना व राजकीय पक्षांतील काही गुंड प्रवृत्तीचे लोक केवळ खंडणीसाठी पारगमन नाक्याची तोडफोड करून ठेकेदार संस्थेला वेठीस धरत आहेत. त्यामुळे पारगमन संकलनाचे काम सोडण्याची वेळ संस्थेवर आली आहे. याबाबत प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने मनपा आयुक्ताकडे बुधवारी केली.

शिवसैनिकांनी मंगळवारी पुणे रस्त्यावरील पारगमन नाक्याची तोडफोड केल्याच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे, काही गुंड प्रवृत्तीचे लोक वेगवेगळ्या पारगमन नाक्यांवर येऊन कर्मचार्‍यांना शिवीगाळ करतात. देणगीच्या गोंडस नावाखाली मोठय़ा रकमेची मागणी करतात. पुणे रस्त्यावरील नाक्यावर घडलेला प्रकार याच कारणातून झाला आहे. काही विघ्नसंतोषी लोकांनी जाणीवपूर्वक ही घटना घडवून आणली. त्यामुळे संस्थेचे दोन लाखांचे नुकसान झाले.

काही दिवसांपूर्वी याच लोकांनी दौंड नाक्याची तोडफोड केली होती. आमच्या कार्यकर्त्यांना नाक्यावर कामाला घ्या, अशी मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास दादागिरी करणे, पोलिस ठाण्यात खोट्या तक्रारी देणे, धमक्या देणे आदी प्रकार करण्यात येतात. याबाबत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.