आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्री साईबाबा उत्सवास शिर्डीत उद्यापासून प्रारंभ, तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा ३० जुलै ते १ अाॅगस्टपर्यंत साेहळा साजरा हाेणार अाहे. या गुरुपाैर्णिमा उत्सवास भाविकांनी माेठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अावाहन संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी अावाहन केले अाहे.

गुरुपाैर्णिमेनिमित्त ३० जुलै राेजी पहाटे साडेचारला श्रींची काकड अारती हाेणार अाहे. पाच वाजता श्रींच्या प्रतिमेची व पाेथीची मिरवणूक काढण्यात येईल. सव्वापाचला द्वारकामाईमध्ये श्री साई सच्चरित अखंड पारायणास सुरुवात हाेणार अाहे. त्यानंतर लगेचच श्रींचे मंगलस्नान हाेणार अाहे. सकाळी ६ वाजता पाद्यपूजा करण्यात येणार अाहे. सायंकाळी ४ वाजता गावातून श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार अाहे. रात्री १० वाजता शेजारती करण्यात येईल. या दिवशी द्वारकामाई दर्शनासाठी रात्रभर उघडी राहणार अाहे. ३१ जुलै राेजी पहाटे साडेचारला श्रींची काकड अारती, ५ वाजता अखंड पारायण समाप्ती, पाेथी व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येईल. रात्री ९ वाजता श्रींची रथातून मिरवणूक काढण्यात येणार अाहे. श्रींच्या उत्सवाचा हा मुख्य दिवस असल्याने मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार अाहे. १ अाॅगस्ट राेजी सकाळी गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक हाेणार अाहे. उत्सव यशस्वी हाेण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान िजल्हा न्यायाधीश विनय जाेशी यांनी केले अाहे.