आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरच्‍या लेखक, कलावंतांचा सहभाग असलेला ‘टोपीवाले कावळे’ 2 ऑगस्टपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगरच्या लेखक, कलावंतांचा महत्त्वाचा सहभाग असलेला कार्तिक फिल्मस् एन्टरटेन्मेंट निर्मित ‘टोपीवाले कावळे’ हा विनोदी मराठी चित्रपट 2 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील प्रमुख चित्रपटगृहांत झळकणार आहे. दोन दिलखेचक आयटम साँग असणारा मराठीतील हा पहिलाच चित्रपट आहे.

नगर येथील साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या ‘टोपीवाले कावळे’ या 2011 मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील दिग्दर्शक, निर्माता शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. राजा कुप्पलूर व अशोक भिंगारदिवे (नगर) हे सहदिग्दर्शक असलेल्या या चित्रपटात सतीश तारे, राजेश शंृगारपुरे (झेंडाफेम), नागेश भोसले, कमलाकर सातपुते, सुनील गोडबोले, शिवाजी दोलताडे, प्रकाश धोत्रे, प्रशांत नेटके, मोहिनी कुलकर्णी, मीनल शितोळे, तेजा देवकर, प्रीती गायकवाड आदींच्या भूमिका आहेत. नगर जिल्ह्यातील नाट्य व चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंतांना या चित्रपटात संधी मिळाली आहे. पूजा काळे, राधाकिसन कराळे, अशोक शिंदे, आयुब आतार, रियाज पठाण, संतोष सुतार, सुनील लामदाडे, चंद्रशेखर कडू, रवी काळे, कुशाभाऊ नेटके, बाळासाहेब गवळी आदींचा त्यात समावेश आहे.

या चित्रपटाचे सहनिर्माते गोवर्धन दोलताडे, अनंत थोरात व विश्वरूप दोलताडे आहेत. संतोष जीवनगीकर (संकलन), वामन घोलप, डी. शिवाजी, मोनू अजमेरी (गीत), पुनित दीक्षित व मोनू अजमेरी (संगीत), संग्राम भालकर (नृत्य), सूरज दास (छायाचित्रण), सिराज पाटील (कला), रौफ आय कुरेशी (ध्वनी), आबा सैंदाणे (रंगभूषा), नीता (वेशभूषा), ज्योती सोनवणे (केशभूषा) आदींनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे. राजकीय नेत्यांवर टीकाटिपण्णी हा या चित्रपटाचा हेतू नसून मनोरंजनातून समाजप्रबोधन हा उद्देश आहे. ‘टोपीवाले कावळे’ या शीर्षकाला अनेकांनी विरोध केला. पण विरोधाला न जुमानता चित्रपट प्रदर्शित होत आहे. राजकारण्यांनाही चित्रपट आवडेल. त्यांच्या चांगल्या बाबी यात मांडण्यात आल्या आहेत, असे दोलताडे यांनी सांगितले.