आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अतुल्य अहमदनगर’मुळे पर्यटनाला चालना मिळेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर जिल्हा पयर्टनाच्या दृष्टीने आदर्श ठरणारा आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख स्थळांची माहिती ‘दिव्य मराठी’ने ‘अतुल्य अहमदनगर’ या कॉफिटेबल बुकमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने मांडली आहे. हे कॉफिटेबल बुक जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारे ठरेल, असे मत पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.

‘दिव्य मराठी’ने तयार केलेल्या ‘अतुल्य अहमदनगर’या जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची छायाचित्रांसह माहिती असलेल्या कॉफिटेबल बुकचे प्रकाशन शुक्रवारी शिंदे, यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंत्री शिंदे म्हणाले, नगर पर्यटन जिल्हा झाला पाहिजे. त्याच्याच एक भाग म्हणून नगरच्या भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा पाठपुरावा सुरू आहे. त्याच्या सुशोभीकरणाचे काम मध्येच बंद पडल्याची खंत आहे. पण, लवकरच केंद्रीय संरक्षणमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याबाबत बैठक होऊन त्यात किल्ला राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याचा करार करण्यात येणार आहे. त्यानंतर किल्ल्याचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यात येईल. नगरमध्ये कोणाकडे पाहुणे आले, की त्यांना कोठे फिरायला न्यायचे, हा प्रश्न असतो. किल्ल्याच्या सुशोभीकरणानंतर तो निकालात निघेल, याची खात्री आहे. नगरच्या वस्तू संग्रहालयासाठीही आपण साडेतीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्याचे काम सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. दिव्य मराठी गेल्या चार वर्षांत पत्रकारितेत विविध लक्षणीय प्रयोग केले. (पानचारवर)
‘दिव्य मराठी’ने तयार केलेल्या ‘अतुल्य अहमदनगर’या पर्यटनविषयक कॉफिटेबल बुकचे शुक्रवारी प्रकाशन करताना गृह, आरोग्य पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री राम शिंदे, समवेत (उजवीकडून) महापौर अभिषेक कळमकर, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी अनिल कवडे, सरव्यवस्थापक शैलेश पाटील, ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे.

‘नो निगेटिव्ह’चे विशेष कौतूक
‘दिव्यमराठी’तर्फे दर सोमवारचा अंक सकारात्मक बातम्यांचा (नो निगेटिव्ह) असतो. त्याची विशेष दखल घेत मंत्री शिंदे यांनी दैनिक भास्कर वृत्तपत्रसमूहाच्या या उपक्रमाचे कौतूक केले. देशभरातील वाचकांची मानसिकता सकारात्मक घडवण्याचा हा उपक्रम मानवतावादी असून, समाजात उच्च नैतिक मूल्ये रुजवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.