आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलांचा बुडून मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील ब्रह्मतळ्यात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी (10 जुलै) दुपारी घडलेली ही घटना सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

फरहान इलियास शेख (वय 15) व साजिद ऊर्फ सोनू हुसेन शेख (वय 16, दोघेही राहणार आलमगीर, भिंगार) अशी या मुलांची नावे आहेत. फरहान दहावीत शिकत होता, तर साजिद फिटर म्हणून काम करायचा. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ते पोहण्यासाठी ब्रह्मतळ्यावर गेले होते. नागरदेवळे येथील एकजण सायंकाळी पाचच्या सुमारास तेथून जात असताना त्याला तळ्याकाठी चपला व कपडे पडल्याचे दिसले.

जवळ जाऊन पाहणी केली असता दोन मुलांचे मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. त्याने तातडीने याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. पोलिस पाटील हरिभाऊ कर्डिले यांनी घटनेबाबत भिंगार कँप पोलिस ठाण्याला कळवले. पोलिस व ग्रामस्थांनी मृतदेह बाहेर काढले. रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. फरहानचे वडिल चहाची टपरी चालवतात, तर साजिदचे वडिल टेलर आहेत. हे दोघेही शेजारी राहत. या घटनेने आलमगीर परिसरावर शोककळा पसरली.