आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्ये पारंपरिक पद्धतीने ‘झावळ्याचा रविवार’ साजरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अहमदनगर पहिली मंडळी, सीएनआय हातमपुरा येथे झावळ्याच्या रविवारची उपासना पारंपरिक पद्धतीने पार पडली. सकाळी 8 वाजता संडे स्कूलच्या विद्यार्थ्यांनी झावळ्यांची मिरवणूक काढली. ‘होसान्ना, होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

झावळ्या सजवून हातमपुरा येथील चर्चपासून प्रभातफेरी सुरू होऊन जुना बाजार, माणिक चौक, कापड बाजार, पारशाखुंटमार्गे पुन्हा चर्चमध्ये आली. यामध्ये शेकडो मुलांसह लेलीडर रवी चांदेकर, रेव्ह. डेव्हिड रावडे, प्रीतम जाधव, एस. के. आल्हाट, पी. डी. कांबळे, राहुल थोरात, सरोज ओहोळ, कमलाकर देठे आदी चर्चच्या पदाधिकार्‍यांस पास्टोरेट कमिटी, महिला मंडळ, तरुण संघ, शाब्बाथ शाळा व ज्येष्ठ संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. फेरीचे संयोजन कादंबरी सूर्यवंशी, सरोज ओहोळ, सुजाता लोंढे, नीता गायकवाड, इंदुबाला पाटोळे, रजनी आढाव, उज्ज्वला पगारे, शोभना गायकवाड, कमलाकर देठे, सुशीला ढगे, मनोज पाटोळे यांनी केले.

फेरीनंतर चर्चमध्ये सिस्टर सुहासबिंदू पी. जाधव यांनी झावळ्याचा रविवारचा संदेश दिला. येशू ख्रिस्ताच्या अंगी असलेली नम्रता, लीनता, सहनशीलता, आपण अंगीकारावी, असे ते म्हणाले.

‘येशू ख्रिस्ताचा जयोत्सवाने जेरुसलेम प्रवेश’ या झावळ्याच्या रविवारच्या उपासनेने पवित्र सप्ताहास सुरुवात होत असल्याचे चर्चचे आचार्य रेव्ह. डेव्हिड रावडे यांनी सांगितले.

झावळ्या हा येशूला दिलेल्या सन्मानाचे प्रतीक म्हणून त्याला महत्त्व असून 100 वर्षांपूर्वी ऑलिम्पिक विजेत्यास पदक म्हणून झावळ्यांचा मुकुट देऊन सन्मान केला जायचा. सद्य:स्थितीत मुलांचे निसर्गाशी नाते जोडले जाऊन धार्मिक परंपराही जतन के ली जात आहे, असे रवी चांदेकर या वेळी म्हणाले.