आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासकीय यंत्रणेमुळेच वाहतूक कोंडी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्टेशन रस्ता परिसरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे पोलिस, आरटीओ, एसटी महामंडळ जिल्हा प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करत आहे. परिणामी समस्या सुटण्याऐवजी ती अधिक गंभीर झाली आहे. विशेष म्हणजे जबाबदारी संबंधित यंत्रणा एकमेकांवर ढकलत असल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले. वाहतूक काेंडी सोडवण्यासाठी तत्काळ योग्य नियोजन झाल्यास संबंधित यंत्रणांच्या विराेधात मंुबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा या परिसरातील रहिवासी अल्ताफ शेख यांनी दिला आहे. शेख यांनी मागवलेल्या माहितीमुळेच ही टोलवाटोलवी उघड झाली आहे.
शहरातून जाणाऱ्या नगर-पुणे महामार्गावर माळीवाडा स्वस्तिक बसस्थानक, नगर महाविद्यालय, तसेच अनेक सरकारी कार्यालये आहेत. त्यामुळे कोठी ते सक्कर चौक परिसरातील (स्टेशन रस्ता) वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, या मागणीसाठी अल्ताफ शेख गेल्या सहा वर्षांपासून पोलिस, आरटीओ, एसटी महामंडळ जिल्हा प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. लोकशाही दिनातही त्यांनी हा प्रश्न पोटतिडकीने मांडला, परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर शेख यांनी आरटीओ, एसटी महामंडळ वाहतूक शाखा यांच्याकडे माहितीच्या अधिकारात वाहतूक कोंडी, त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजना कारवाईबाबत माहिती विचारली. या माहितीमध्ये संबंधित यंत्रणेने आपली जबाबदारी झटकून ती एकमेकांवर ढकलल्याचे समोर आले. रस्त्यावर बस थांबवून प्रवाशांची चढउतार करू नये, असे पत्र आगारप्रमुखांना दिले असल्याचे उत्तर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिले आहे, तर माळीवाडा बसस्थानकाच्या आऊटगेटसमाेर बस थांबवू नये, असे पत्र सर्व आगारप्रमुखांना दिले असल्याचे उत्तर एसटी महामंडळाच्या विभागीय वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकारात दिले आहे. कारवाईबाबत मात्र कोणत्याच विभागाने ठोस माहिती दिलेली नाही.
कारवाई करण्याची जबाबदारी त्यांनी एकमेकांवर ढकलली आहे. या संबंधित यंत्रणेमुळेच स्टेशन रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे यावरून स्पष्ट होते. त्यामुळेच संबंधित यंत्रणांच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्याचा निर्णय शेख यांनी घेतला आहे. वाहतूक काेंडीच्या तक्रारीबाबत दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी; अन्यथा संबंधित यंत्रणांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचा इशाराही शेख यांनी दिला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा आदेशाची ऐसी की तैसी...
बातम्या आणखी आहेत...