आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल दोन तास नगरकर अडकले वाहतूक कोंडीत...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातील स्टेशन रस्त्यावरील चांदणी चौक ते सक्कर चौकादरम्यान सोमवारी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत नगरकरांना प्रचंड वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागले. वाहतुकीचे कोणतेही नियोजन नसल्याने नाहक दोन तास नागरिक वाहतूक कोंडीत अडकले.
सुमारे दोन किलोमीटर लांबच लांब वाहनांची रांग लागली होती. सुमारे चारशे अवजड वाहने, सव्वाशे एसटी बस, चारशेहून अधि क कार व जीप, चार रूग्णवाहिका, तसेच शेकडो दुचाकी वाहने या कोंडीत अडकली होती. या रस्त्यावर सात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात कोंडी सोडवण्यासाठी फक्त दोनच वाहतूक पोलिस उपस्थित होते. कायम बंद असलेल्या सिग्नल्समुळे अडचणीत आणखी भर पडली. छाया : कल्पक हतवळणे