आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TRAI Authorities Conducts Awareness Programme In Nagar

हक्कांविषयी जागरूक राहून मिळवा सर्वोत्तम टेलिकॉम सेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भारत हा जगातील एकमेव, तसेच सर्वात स्वस्तात भ्रमणध्वनी सेवा उपलब्ध असलेला देश आहे. कारण, येथे विविध कंपन्या या क्षेत्रात उतरलेल्या आहेत. त्यामुळे चांगली स्पर्धा निर्माण झालेली अाहे. त्याचा फायदा ग्राहकांना होत आहे. असे असले तरीही टेलिकॉम सेवा देणार्‍या कंपन्यांबद्दल अनेक तक्रारी आहेत. याबद्दल ग्राहकांनी जागरूक राहून सर्वोत्तम टेलिकॉम सेवा मिळवावी, तो त्यांचा हक्कच आहे, असे आवाहन "ट्राय'चे कर्नाटक, केरळ महाराष्ट्र क्षेत्रप्रमुख डॉ. सिबिचेन के. मॅथ्यू यांनी केले.

टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) माउली संकुल सभागृहात ग्राहक जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ट्रायच्या बंगळुरू क्षेत्रीय कार्यालयाचे संयुक्त सल्लागार ले. कर्नल मनीष राघव, वरिष्ठ संशोधन अधिकारी के. मुरलीधर उपस्थित होते. यावेळी डॉ. मॅथ्यू यांनी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी, अनावश्यक फोन कॉल्स कसे टाळावे, मूल्यावर्धित सेवा, तक्रार नोंदवण्याच्या पद्धती, याबद्दल माहिती दिली.

कोणतीही तक्रार, सेवा, विनंती स्वीकारणार्‍या ग्राहकाला दक्षता केंद्राशी संपर्क करावा लागतो. नंतर तक्रार नोंदवली जाऊन तक्रारीची विस्तारित माहिती क्रमांक, दिनांक, वेळ, तक्रार िनवारणासाठी लागणारा वेळ ग्राहकाला एसएमएसद्वारे दिले जाते. जर ग्राहक तक्रार निवारणाबाबत समाधानी नसेल तर, तो उच्च अधिकार्‍यांकडे जाऊ शकतो. ग्राहकाला दूरध्वनी देणारी सेवा बदलायची असेल, तर तो पोर्टेबिलिटी करू शकतो. ग्राहकाला नको असलेली सेवा सुरू झाल्यास ती बंद करण्यासाठी मोफत क्रमांकाची सुविधा कंपनीने ठेवणे बंधनकारक आहे.
केबल टीव्ही डिजिटालायझेशन नगरमध्ये ३१ डिसेंबर २०१४ नंतर तिसर्‍या टप्प्यात सुरू होत आहे. त्यामुळे ब्रॉडबँडद्वारे अनेक मूल्यावर्धित सेवा ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. केबल ऑपरेटरकडे याबाबत तक्रार िनवारण व्यवस्था असणे बंधनकारक आहे. ग्राहकांची जनजागृती करणारी माहिती पुस्तके यावेळी वितरित करण्यात आली. महाविद्यालयीन युवक मोबाइल ग्राहक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक ले. कर्नल मनीष राघव यांनी केले. त्यांनी ट्रायच्या क्षेत्रीय कार्यालयाने मोबाइल ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या संरक्षणात्मक उपायांची माहिती दिली.
उत्तम सेवेसाठी एसएमएस सुविधा
नको असलेली सेवा बंद करण्यासाठी एसएमएस कोड क्र. : १५५२२३
नको असलेले कॉल्स मेसेज बंद करण्यासाठी एसएमएस क्र. : १९०९
दूरध्वनी सेवा कंपनी बदलायची असल्यास एसएमएस क्र. - PORT (दहा अंकी मोबाइल क्र.) १९०० क्रमांकावर पाठवावा.