नगर-जिल्ह्यात बदलून आलेल्या व नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिस निरीक्षक व सहायक पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक आर. डी. शिंदे यांनी सोमवारी (3 मार्च) रात्री नियुक्तीचे आदेश दिले. यात काही अधिकार्यांच्या बदल्याही करण्यात आल्या.
नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे - (कंसात नियुक्तीचे ठिकाण) लक्ष्मण भाऊसाहेब काळे (तोफखाना), विजय शंकरराव टिकोळे (सुपा), अनिल गंगाधर नलावडे (घारगाव), श्याम यादवराव सोमवंशी (संगमनेर शहर), संजय भगवान भामरे (संगमनेर तालुका), साजन रुपलाल सोनवणे (कोपरगाव), सुरेश सुपडू सपकाळे (र्शीरामपूर शहर), उमेश रामचंद्र हजारे (पाथर्डी), नितीनकुमार सुखदेव चव्हाण (कर्जत), शशिराज गुंडोपंत पाटोळे (र्शीगोंदे), अशोक फकिरा खंदारे (नियंत्रण कक्ष), सुरेश तुकाराम शिंदे (नेवासे), दिलीपकुमार बाबुराव पारेकर (जिल्हा विशेष शाखा), अजित शंकर लकडे (शेवगाव), शरद रामदेव जांभळे (पारनेर), नारायण जयसिंग वाखरे (बेलवंडी), प्रकाश हरी सपकाळे (नियंत्रण कक्ष).
नियुक्त्या मिळालेले सहायक पोलिस निरीक्षक : राहुल बाबासाहेब गायकवाड (स्थानिक गुन्हे शाखा), संगीता रामदास राऊत (शिर्डी), सुनील जनार्दन टोणपे (स्थानिक गुन्हे शाखा), अजित तुकाराम पितले (कर्जत), अनिल मोहनदास बेहेरानी (तोफखाना), विनायक गोविंद सरवदे (नेवासे), किशोरकुमार भिलासिंग परदेशी (स्थानिक गुन्हे शाखा), भरत दत्तात्रेय जाधव (कोतवाली), नितीन दौलतराव पगार (कोतवाली), शिवाजी राजाराम पाळदे (र्शीरामपूर शहर), सुनील हंसराज पवार (सोनई), सचिन दत्तात्रेय वांगडे (जिल्हा विशेष शाखा), पुरुषोत्तम वामन चोभे (जिल्हा विशेष शाखा), किरणकुमार भगवानराव बकाले (एमआयडीसी), विश्वास रावसाहेब निंबाळकर (नगर तालुका), राहुलकुमार अरुण पाटील (राजूर).
सोनईत पवार व वांगडेंत वाद
बदलीचे आदेश मिळाल्यानंतर शिर्डी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुनील हंसराज पवार यांनी मंगळवारी सोनई पोलिस ठाणे गाठले. तेथील सहायक पोलिस निरीक्षक सचिन दत्तात्रेय वांगडे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. ठाण्याचा प्रभार घेण्यावरून पवार व वांगडे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हजर न होताच पवार यांना शिर्डीला परतावे लागले. या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे सोनईकरांचे लक्ष लागले आहे.