आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण विभागात बदल्यांचा सपाटा, सत्ताधारी सदस्यच आंदोलनाच्या पवित्र्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागांतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा शिक्षण विभागाने लावल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील सदस्य सुजित झावरे यांनी केला. त्यामुळे प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. स्थायी समितीच्या १८ जानेवारीला होणाऱ्या सभेच्यावेळी आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

शिक्षण विभागांत दहा हजारांवर कर्मचारी आहेत. बदल्यांमुळे हा विभाग वादग्रस्त ठरतो. दीड हजारावर आंतरजिल्हा बदल्यांचे प्रस्ताव रिक्त जागांअभावी धुळखात पडले आहेत. काही महिन्यांपूर्वी २०७ आंतरजिल्हा बदल्यांना जिल्हा परिषदेने हिरवा कंदील दाखवला. परंतु वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट सूचना नसल्याने या बदल्या होऊ शकल्या नाहीत. नुकतीच २०१४-२०१५ या वर्षातील संचनिश्चिती झाली. त्यानुसार समायोजनालाही गती देण्यात आल्याची माहिती खासगीत समजली. परंतु इतर प्रक्रियेसाठी २०१६च्या संचनिश्चितीची प्रतीक्षा सुरू आहे.
अलीकडे बदल्यांचा सपाटा शिक्षण विभागाने लावल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांनी केला आहे. पत्रकारांशी खासगीत बोलताना त्यांनी याबाबीचा खुलासा केला. हे प्रकरण थेट मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्यापर्यंत नेण्यात आले. त्यावर नवाल यांनी लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती समजली.

सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या मंजूषा गुंड, तर उपाध्यक्षपदी शेलार कार्यरत आहेत. शेलार हे शिक्षण समितीचेही सभापती आहेत. अशा परिस्थितीत बेकायदेशीर बदल्या केल्या जात असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षातील झावरे यांनी केल्याने पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, झावरे यांनी अांदोलनाची भूमिका घेऊ नये यासाठी काही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. १८ जानेवारीला होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेच्या दिवशी आंदोलन करण्याची तयारी झावरे यांनी केली आहे. तत्पूर्वी बदली प्रक्रियेची चौकशी सुरू झाली, तर आंदोलन टळू शकते.
पुढे वाचा, आंदोलन टाळण्यासाठी धावाधाव...
बातम्या आणखी आहेत...