आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक वारसा दिनानिमित्त आज भुईकोट किल्ल्यात भ्रमंती; शहरात विविध उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-  ‘इंटरनॅशनलकौन्सिल ऑन मॉन्युमेंटस आणि साईटस््’ या आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे १८ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वारसा दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. या उपक्रमाचा एक भाग म्हणून नगर परिसरातील ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्याचे आवाहन ‘स्वागत अहमदनगर’च्या वतीने करण्यात आले आहे. 

पाच शतकांचा प्रदीर्घ ऐतिहासिक वारसा मिळालेल्या जगातील मोजक्या शहरांमध्ये अहमदनगरचा समावेश होतो. नगर जिल्ह्याला तर त्याहूनही प्राचीन वारसा मिळालेला आहे. आदिमानवापासूनचे अवशेष जिल्ह्यात विविध ठिकाणी केलेल्या उत्खननात आढळले आहेत. दायमाबाद, जोर्वे येथे सापडलेले अवशेष हडप्पा, मोहोनजोदडो खालोखाल महत्त्वाचे मानले जातात. तथापि, या समृद्ध वारशाकडे प्रशासन लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. 

आपल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन संवर्धन केले जावे, म्हणून जागतिक वारसा दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने अशा वारसा स्थळांना नागरिकांनी भेटी द्याव्यात, या वास्तूंची स्वच्छता देखभाल करावी, या वास्तूंशी निगडित इतिहास लोकांपुढे यावा, विशेषत: शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची माहिती पोहोचावी, अशी यामागील उद्दिष्ठे आहेत. 

या वर्षीच्या जागतिक वारसा दिनाचे ब्रीदवाक्य ‘कल्चरल हेरिटेज अँड सस्टेनेबल टुरिझम’ हे अाहे. याचा एक भाग म्हणून ‘स्वागत अहमदनगर’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (१८ एप्रिल) नगरच्या किल्ला भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी वाजता किल्ला प्रदक्षिणेला प्रारंभ होईल. हा उपक्रम सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी ९८८१३३७७७५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...