आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगोंद्याच्या गोरक्षण संस्थेमधील मरणासन्न गायींवर उपचार, ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे - येथील गोरक्षण संस्थेतील देशी गाई बैलांची बेफिकिरीमुळे होणारी हेळसांड भाकड जनावरांची मरणासन्न स्थिती दैनिक दिव्य मराठीने मंगळवारी उघडकीस आणली. त्यानंतर गोवंशप्रेमींनी पुढाकार घेऊन या मुक्या जीवांवर उपचार केले. 
 
गोरक्षण संस्थेत गीर गाईंचा जीवापाड सांभाळ केला जात असताना भाकड गावरान, तसेच जर्सी गाईंकडे दुर्लक्ष केले जात होते. वेळेवर खाद्य मिळत नव्हते. अनेक भाकड गायी जखमी झाल्या आहेत. जखमांतून रक्त भळभळत होते. कोणाचे शिंग तुटले होते. औषधोपचारांअभावी काही जनावरे खंगून गेली होती. याबाबत गोप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 
 
बजरंग दलाचे शहराध्यक्ष सोनू कोथिंबिरे, स्वप्नील खेत्रे, अमोल हिरणावळे, सुनील निंबाळकर भाजपचे संजय गोरक्षण संस्थेत गेले. त्यांनी पशुवैद्यक डॉ. शिवाजी पवळ यांना बोलावले. जनावरांवर प्रथमोपचार करण्यात आले. डहाळे यांनी हा खर्च उचलला. डॉ. पवळ यांनी जनावरांच्या जखमा स्वच्छ केल्या. त्यावर औषधोपचार केले. 
कोथिंबिरे खेत्रे म्हणाले, आम्ही जीवाची बाजी लावून कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे पकडून देतो. त्यांचा सांभाळ येथे व्यवस्थित होत नसेल, तर गोभक्षक आणि यांच्यात फरक काय? संस्थाचालक मग्रुरीची भाषा करतात. त्यांना घमेंड आहे. यात बदल झाला नाही, तर बजरंग दल आक्रमक पवित्रा घेईल.” 
 
दिव्य मराठीला बजरंग दलाकडून धन्यवाद 
श्रीगोंद्यातील गोशाळेत जनावरांची होत असलेली हेळसांड दैनिक दिव्य मराठीने उघडकीस आणली. छायाचित्रांतील गोवंशाची हलाखीची स्थिती पाहून अनेकांचे डोळे पाणावले. ‘दिव्य मराठी’ने मुक्या जीवांची व्यथा मांडल्याबद्दल बजरंग दलाच्या वतीने आभार मानण्यात आले. शहराध्यक्ष सोनू कोथिंबिरे, स्वप्नील खेत्रे भाजपचे संजय डहाळे यांनी दिव्य मराठीला मनापासून धन्यवाद दिले. 
 
जय भैरवनाथकडून पाच हजारांची मदत 
श्रीगोंदे येथील जय भैरवनाथ मंडळाकडून गोशाळेतील जखमी जनावरांवर उपचारांसाठी पाच हजारांची औषधे दिले जाणार आहेत. रोख रकमेपेक्षा पाच हजार औषधोपचारांसाठी दिले जातील, अशी माहिती मंडळाचे रमेश होले, जयंत होळकर, शरद चव्हाण, भय्या शेख, सनी कोथिंबिरे यांनी दैनिक दिव्य मराठीला दिली. आणखी काहीजणांनीही गायींवरील उपचारांसाठी मदत देण्याची तयारी दाखवली आहे. 
बातम्या आणखी आहेत...