आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षसंवर्धन काळाची गरज : शरद क्यादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- स्वत:च्या अस्तित्वासाठी वृक्षारोपण करा. मनुष्याला भविष्यात स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे, जर हे उपाय योजले नाही, तर भविष्यात मनुष्याला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. याची प्रचिती दुष्काळ, अकालवृष्टी व गारपिटीने येत आहे, असे प्रतिपादन पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद क्यादर यांनी केले.
हरित महाराष्‍ट्र अभियानांतर्गत मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, श्रमिकनगरच्या वतीने आयोजित वृक्षदिंडीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी क्यादर व संस्थेचे सचिव विलास पेद्राम यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून वृक्षदिंडीला प्रारंभ करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे यांनी केले, तर माध्यमिकचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे यांनी प्रास्ताविकात विविध उपक्रमांची माहिती दिली.
वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी घोषणा देत वृक्षसंवर्धन, वृक्षलागवडीचे संदेश दिले. सजवण्यात आलेल्या पालखीत असलेले विविध रोपटे दिंडीचे आकर्षण ठरत होते.

श्रमिकनगर, पाइपलाइन रोड, भिस्तबाग चौक, वैदूवाडी येथून मार्गक्रमण करून शाळेत वृक्षदिंडीचा समारोप झाला. आभार भारती गाडेकर यांनी मानले. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.