आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षतोडप्रकरणी कारवाईचे आदेश, महािवद्यालय विरोधात तातडीने कारवाई करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर ; न्यूआर्टस महािवद्यालयातील बोटॅनिकल गार्डनमधील वृक्षतोडीची सभापती गणेश भोसले यांनी मंगळवारी पाहणी केली. बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्या महािवद्यालय विरोधात तातडीने कारवाई करा, असे आदेश त्यांनी मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे परेश पुरोिहत, संतोष भोसले, नामदेव भोसले, किसन गोयल उपस्थित होते.
भोसले म्हणाले, कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडता वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई झाली पािहजे. त्यािशवाय समाजाला वृक्ष संवर्धनाचे महत्त्व कळणार नाही. मी स्वत: प्रभागात गेल्या १० वर्षांपासून वृक्षलागवड करत आहे. वृक्ष वाढवणे ही किती मोठी कसरत आहे, ते मला चांगलेच मािहती आहे. महाविद्यालयाने कोणताही विचार करता गार्डनमधील वृक्षांची कत्तल केली. महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेता महािवद्यालयाने हा प्रकार केला. त्यामुळे मनपाच्या अिधकाऱ्यांनी तोडलेल्या वृक्षांचा पंचनामा करून कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश भोसले यांनी दिले. दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेने देखील याप्रकरणी आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.