आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृक्षलागवड ही सातत्यपूर्ण लोकचळवळ होणे गरजेेचे, जिल्ह्यात व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पर्यावरण संतुलनासाठी आगामी काळात राज्यात २५ कोटी वृक्ष लावण्याचे उद्दि‍ष्ट आहे. वृक्षारोपण हा "इव्हेन्ट' होता सातत्यपूर्ण लोकचळवळ व्हावी, असे प्रति‍पादन पालकमंत्री राम शिदे यांनी केले.
चि‍चोंडी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वृक्ष लागवडीचा जि‍ल्हास्तरीय प्रारंभ करताना शिंदे बोलत होते. आमदार शि‍वाजी कर्डिले, राहुल जगताप, पालकसचि‍व डॉ. पुरुषोत्तम भापकर, जि‍ल्हाधि‍कारी अनि‍ल कवडे, पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रि‍पाठी, जि‍. प. मुख्य कार्यकारी अधि‍कारी रवींद्र बि‍नवडे, अतिरिक्त जि‍ल्हाधि‍कारी भानुदास पालवे, पं. स. सभापती संदेश कार्ले, उपसभापती शरद झोडगे, दत्तात्रेय सदाफुले, पोपट नि‍मसे, चि‍चोंडी पाटीलच्या सरपंच अर्चना चौधरी, उपसरपंच शरद पवार, सामाजि‍क वनीकरणचे उपसंचालक चंद्रकांत तांबे, उपवन संरक्षक जी. डी. वळसे, उपजि‍ल्हाधि‍कारी दत्तात्रेय बोरुडे, उपवि‍भागीय अधि‍कारी वामन कदम, तहसीलदार सुधीर पाटील, प्रभारी जि‍ल्हा अधीक्षक कृषी अधि‍कारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपवि‍भागीय कृषी‍ अधि‍कारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी‍ अधि‍कारी बाळासाहेब नि‍तनवरे, प्राचार्य कोकाटे, मनोज कोकाटे आदी यावेळी उपस्थि‍त होते.

पालकमंत्री शि‍ंदे म्हणाले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दूरदृष्टिकोनातून दोन कोटी वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. राज्यभरात हे अभि‍यान राबवण्यात येत असून जिल्ह्यात १९ लाख वृक्षारोपणाचे नि‍योजन आहे. गेल्या काही वर्षात पर्यावरणाचा ऱ्हास बेसुमार वृक्षतोडीमुळे पाऊस पडण्यात अनि‍यमि‍तता वाढत गेली. हवामानातील बदल ऋतूमानातील असंतुलनातून पाणीटंचाईसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पर्यावरणाचे संतूलन राखण्यासाठी वृक्षारोपण वृक्षसंवर्धन आवश्यक आहे. लावलेल्या रोपांचे वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

शि‍ंदे यांनी चि‍चोंडी पाटील परि‍सरातील शि‍वार फेरी करत केळ तलावाची पाहणी केली, तसेच जलपूजनही केले. तलावाच्या दुरुस्तीबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सर्वाधिक झाडे टाकळी ढोकेश्वर वनपरिक्षेत्रात
टाकळीढोकेश्वर वनपरिक्षेत्रात वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक म्हणजे एक लाख ९९ हजार वृक्षलागवड शुक्रवारी करण्यात आली. या वनपरिक्षेत्रासाठी असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. या वनपरिक्षेत्रातील एकट्या वनकुटे गावात ८४ हजार ३४० झाडे लावण्यात आली. निर्मला शिंदे या वनरक्षकाने ३४ हजार झाडे लावण्याचा उच्चांक नोंदवला.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे शुक्रवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या शासकीय मोहिमेला जिल्ह्यात प्रारंभ झाला.
बातम्या आणखी आहेत...