आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांचा सांस्कृतिक आधारस्तंभ निखळला; डॉ. गोपाळराव मिरीकर यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- बहुआयामीडॉ. गोपाळराव मिरीकर यांच्या निधनाने पत्रकारिता सांस्कृतिक क्षेत्रातील आधारस्तंभ निखळल्याची भावना अनेक मान्यवरांनी मंगळवारी शोकसभेत व्यक्त केली. डॉ. मिरीकर यांना नगर शहराविषयी प्रचंड आस्था होती. नगर व्यासपीठच्या माध्यमातून शहराच्या भल्यासाठी त्यांनी उपक्रम राबवले. आमचे ते श्रद्धास्थान होते. अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवण्यात डॉ. मिरीकर यांचा पुढाकार होता, असे सांगत पत्रकार सुधीर मेहता यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 


माजी आमदार अनिल राठोड यांनी शिवसेनेतर्फे श्रद्धांजली वाहताना डॉ. मिरीकर यांच्या राजकीय अभ्यासाचा मार्गदर्शनाचा उल्लेख केला. राष्ट्रवादीचे माजी आमदार दादा कळमकर यांनी डॉ. मिरीकर यांच्या आकाशवाणीवरील बातम्यांची आठवण सांगितली. जि. प. सदस्य सचिन जगताप यांनी ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याचे सांगितले. स्नेहालयाचे डॉ. गिरीश कुलकर्णी म्हणाले, डॉ. मिरीकर हे कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. समाजकारण राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचा दबदबा होता. डॉ. मिरीकर यांनी रेडिओ नगरचे संचालक म्हणून आठ वर्षे मोलाचे मार्गदर्शन केले, असे त्यांनी सांगितले. 


डॉ. मिरीकर मूळचे मिरीचे. तेथील ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित राहून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. शहरातील पत्रकार, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणक्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मिरीकर यांच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. 


प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतर्फे संचालक बन्सी तांबे यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. मिरीकर यांना श्रद्धांजली वाहिली. संस्थेचे सहसचिव भारत घोगरे म्हणाले, डॉ. मिरीकर हे बाळासाहेब विखे यांच्या समवेत राजकीय, सामाजिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सातत्याने प्रवरानगरला येत. राधाकृष्ण विखे यांच्यासमवेतही विविध विषयांवर ते चर्चा करत. व्यासंगी पत्रकार, संगीताचा चाहता, तसेच सदैव सत्यासाठी संघर्ष करणारा लढाऊ बाण्याचा एक माणूस आपल्यातून गेल्याचे दुःख मोठे अाहे. 


कवी, नाटककार... 
पत्रकार,संगीततज्ज्ञ, शिक्षण तज्ज्ञ म्हणून ज्ञात असलेले डॉ. मिरीकर हे उत्तम कवी आणि नाटककारही होते. राजकारणावर त्यांनी लिहिलेल्या ‘सी एम’ नाटकाच्या आठवणी रंगकर्मींनी सांगितल्या. प्रारंभी मिरी येथील आपल्या शेतीतही त्यांनी विविध प्रयोग केले होते. 

बातम्या आणखी आहेत...