आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिमूर्ती प्रतिष्ठानमधील गाडेंचा जामीन फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या शिक्षण संकुलातील विद्यार्थिनी तेजस्विनी डोमाळ हिच्या आत्महत्याप्रकरणी वसतिगृह अधीक्षक मंदा शिंदे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला, तर आरोपी क्रमांक एक विभागप्रमुख अशोक गाडे यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला.
या प्रकरणी गुरुवारी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी झाली. शिंदे या वसतिगृह अधीक्षक असल्याने तपासासाठी त्यांना अटक करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. घटनेच्या आदल्या दिवशी रात्री कार्यक्रमाचे सूत्रसंचालक गाडे होते.
शवविच्छेदनाचा अहवाल राखून ठेवला असल्याने मृत्यूचे खरे कारण वेळ स्पष्ट होत नसल्याने तपासासाठी गाडेंना अटक करण्याची गरज पोलिसांनी व्यक्त केली. ऑक्टोबरला मुलीने झोपेच्या गोळ्या घेतल्याने ती बेशुद्ध झाली. तिच्यावर उपचारही झाले. त्यामुळे आईने तिला घरी नेले. २४ ऑक्टोबरला ती विद्यालयात परत आली. २६ ला ती कोजागरीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. २७ ला तिने आत्महत्या केल्याचे वकिलांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...