आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Try To Increase Income, Standing Committee Said To Municipal

उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा, स्थायी समितीची मनपा प्रशासनाला सूचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा, अशा सूचना स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांच्यासह सदस्यांनी प्रशासनाला शनिवारी दिल्या. यावेळी सभापतींसह सदस्यांनी मनपाच्या उत्पन्न वाढीबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. सभापती भोसले यांचा कार्यकाळही महिनाभरात संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या स्थायीच्या सभेस विशेष महत्त्व होते.
सभापती भोसले यांनी टीव्ही सेंटरजवळील मनपाच्या सावित्रीबाई फुले व्यापारी संकुलाबाबत प्रशासनाला जाब विचारला. मनपाच्या बेवारस इमारती भाडेतत्त्वावर देऊन मनपाचे उत्पन्न वाढवता येईल. त्यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना भोसले यांनी दिल्या. मनपाच्या मालकीचे अनेक भूखंड आहेत, काहींवर अतिक्रमण झालेले आहे, असे भूखंड मनपाने भाडेतत्त्वावर दिले, तर मनपाच्या उत्पन्नात भर पडेल, अशा अनेक सूचना सदस्यांनी सुचवल्या. मनपाच्या वेगवेगळ्या विभागातील अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांना चुकीच्या जागी नेमले आहेत. ही महापालिका आहे, की ग्रामपंचायत, अशा शब्दांत भोसले यांनी नाराजी व्यक्त केली. या कर्मचारी अधिकाऱ्यांची योग्य जागी बदली करा, काही दिवसांपूर्वी विद्युत विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आलेल्या आर. जी. सातपुते यांना या कामाचा अनुभव नाही, त्यांना तातडीने बांधकाम विभागात पाठवण्याच्या सूचना सभापती भोसले यांनी दिल्या.

या विषयांना मिळाली मंजुरी
देशपांडे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नर्स यांना दरमहा मानधनावर प्रतिनियुक्ती देणे, बुरूडगाव कचरा डेपो येथे २०० केव्हीएचा ट्रान्सफार्मर पाच एल. टी. पोल बसवणे, नगरोत्थान अभियानांतर्गत औरंगाबाद महामार्ग ते जुने ग्रामपंचायत कार्यालय ते संजोगगर कोपऱ्यापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण डांबरीकरण करणे, मनपाच्या मालकीच्या शहरातील अंतर्गत रस्त्यावर बीओटी तत्त्वावर दिशादर्शक फलक बसवणे, रस्ता बाजू कर वसुलीसाठीचे निविदा दर कमी करणे, पाणीपुरवठा विभागातील निरूपयोगी साहित्याची विक्री करणे, केडगाव येथील स्टेशन रस्त्यावरील मनपाच्या शाळा क्रमांक जवळील जागा भाडेतत्त्वावर देणे, यश पॅलेस ते चाणक्य चौक रस्त्यावरील आनंदऋषीजी रुग्णालयाजवळील माणिकनगर येथील रस्त्यापैकी जागा पार्किंगसाठी भाडेतत्त्वावर देणे आदी.