आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बलात्कारप्रकरणी दोन आरोपींना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - नोकरीचे आमिष दाखवून राहुरीतील तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी रविवारी एकास अटक केली. विलास हरिभाऊ वर्पे (४७, बोल्हेगाव) असे आरोपीचे नाव आहे. अन्य दोन आरोपींपैकी एकाला पुणे येथे पोलिसांनी अटक केली. अन्य एकजण अद्याप फरार आहे.
बोल्हेगाव (ता. नगर) येथील विलास हरिभाऊ वर्पे (४७) याने पीडित युवतीला बँकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून धर्माडी येथे शनिवारी तिच्यावर बलात्कार केला. यावेळी टारगटांनी युवती विलासला धमकावून आम्ही वन विभागाचे कर्मचारी आहोत. तुला आमच्याबरोबर अतिथी गृहावर यावे लागेल, असे सांगून बळजबरीने अतिथीगृहावर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नगर-मनमाड राज्यमार्गावर महात्मा फुले कृषी विद्यापीठानजीक धर्माडी येथे शनिवारी ही घटना घडली.

या प्रकारानंतर राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी विलास वर्पे याला राहुरी न्यायालयात रविवारी हजर करण्यात आले. न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, रविवारी जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित युवतीला वैद्यकीय उपचार तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संशयित फरारी अारोपीचा शोध पोलिस घेत असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यानी सांगितले. पीडित युवतीचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आहे. अारोपी विलास वर्पे याची भावजयी पीडित युवतीचे वडील नगरच्या आैद्योगिक वसाहतीत एका खासगी कंपनीत नोकरीला होते. आरोपी विलासने पीडित युवतीला नोकरीचे आमिष दाखवून शनिवारी तिला एका निर्जन स्थळी नेऊन बलात्कार केला. हा प्रकार अन्य दोन टारगटांनी पाहिला. त्यांनीही नंतर तिच्यावर बलात्कार केला. राहुरी पोलिसांनी युवतीच्या तक्रारीवरून तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुख्य आरोपी वर्पे याला अटक करण्यात आली असून दोनपैकी एका आरोपीला पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...