आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग करणाऱ्या दोन आरोपींना पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोन आरोपींना पोलिस कोठडी सुनावली. अविनाश अनिल पडघमल अनिकेत प्रभाकर लोंढे (दोघेही राहुरी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांना राहुरी पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली. त्यांना बुधवारी दुपारी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपासी अधिकारी सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. सुरेश लगड यांनी गुन्ह्याच्या अधिक तपासाकरिता आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ती मान्य करत जिल्हा न्यायाधीश ए. पी. तनखीवाले यांनी आरोपींना २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.