आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्राचा धाक दाखवून अडीच लाखांचा ऐवज लांबवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बंगल्यातील स्वयंपाकखोलीत प्रवेश करत घरातील महिलेला धारदार शस्त्राचा धाक दाखवून चौघा चोेरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. जबरी चोरीची ही घटना गुरुवारी पहाटे सावेडीतील मेघराज कॉलनीतील रेणुका बंगल्यामध्ये घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी घरफोडी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, बंगल्यात लावलेल्या सीसीटीव्हींनी चोरट्यांच्या हालचाली टिपल्या आहेत.

अन्नपूर्णा प्रवीण कुंडलवाडीकर यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या स्वयंपाकखोली दरवाजाची कडी कोयंडा तोडून चोरटे आत आले. त्यांनी कुंडलवाडीकर यांना कोयत्यासारख्या शस्त्राचा धाक दाखवून रॉडने मारहाण केली. त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, त्यांचे पतीच्या गळ्यातील सोन्याची चेन, घरातील घड्याळ, असा सुमारे लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला. जाताना चोरट्यांनी इतर खोल्यांचे दरवाजे बंद करून घेतले.
या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक, तोफखाना पोलिस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी पाहणी केली. चोरटे हिंदी भाषेतून बोलत असल्याचे कुंडलवाडीकर कुटुंबीयांनी सांगितले. दरम्यान, बंगल्यात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या आहेत. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक निरीक्षक सुनील टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...