आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन आदिवासी मजुरांचे मृतदेह भट्टीजवळ आढळले; जुने पढेगावची घटना, अति मद्यसेवनाने मृत्यूचा संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- जुने पढेगाव येथे कोळशाच्या भट्टीवर काम करणाऱ्या दोन आदिवासी मजुरांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मृतदेहाशेजारी दारूच्या बाटल्या होत्या. 


संतोष शिवा वाघमारे (वय ४५) रवींद्र सखाराम घोगरे (२८) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही गायचूर (ता. रोहा, जि. रायगड) येथील रहिवासी आहेत. शनिवारी आठवडे बाजार असल्यामुळे त्यांना सुटी होती. रविवारी ठेकेदाराने त्यांच्या झोपडीजवळ शोध घेतला असता ते सापडले नाहीत. अखेर शेतातील कोळशाच्या भट्टीजवळ सकाळी त्यांचे मृतदेह आढळून आले.पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. ते आल्यानंतरच शवविच्छेदन केले जाणार आहे. मृतदेह श्रीरामपूर येथे शवागृहात आणण्यात आले आहेत. पोलिसांना त्यांच्या अंगावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत. दारूच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 


पोलीस पथक येईपर्यंत बबन दामू राठोड, प्रेमाबाई राठोड, नामदेव पवार, पारुबाई पवार (सर्व ढवळपुरी, ता. पारनेर) हे मजूर पसार झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...