आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Brothers Dead With Her Sister At Rahuri Ahmednagar District

सख्ख्या बहिणींसह तिघींचा बुडून मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी- शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या आदिवासी समाजातील तीन शाळकरी मुलींचा गुरुवारी दुपारी राहूरी तालुक्यातील मुसळवाडी तलावात बुडून मृत्यू झाला. लहान बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात अन्य दोघींचाही अंत झाला. मृतांत सोनल खंडू बर्डे (१०), ललिता बर्डे (१२) या सख्ख्या बहिणी आणि पूनम संजय बर्डे (१३) यांचा समावेश आहे.
शेळ्या चारत असताना तोल जाऊन सोनल तलावात पडली. तिला वाचवण्यासाठी ललिता व पूनमने पाण्यात उडी मारली. परंतु तिघींनाही पोहता येत नसल्याने त्या खोल पाण्यात बुडाल्या. ही घटना आराध्या बर्डे हिने पाहिली. तिने ही घटना रहिवाशांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर तिघींनाही पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र, त्या वाचू शकल्या नाहीत. सोनल व ललिता तिसरीत शिकत होत्या. मुळा नदीपात्रात, तलावात वाळू्उपशासाठी केलेल्या खड्ड्यात निष्पापांचा बळी गेला. मुलींचे मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात आणले त्या वेळी वरिष्ठ डाॅक्टर हजर नव्हते. नर्स मोबाइलमध्ये मग्न होत्या, अशा तक्रारी मृतांच्या नातलगांनी केल्या.