आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार झाडावर धडकून दोन डॉक्टरांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - लोणीजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. या अपघातात दोन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला, तर एका डॉक्टर गंभीर जखमी असून त्याच्यावर प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेले तिघे डॉक्टर हे प्रवास करत असलेली शेवरोले गाडी (एम.एच.-१४-सीके-३०९३) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या झाडावर आदळल्याने भीषण अपघात झाला. त्या अपघातात डॉ. कसुदरा धवल कुमार मेहरतभाई (२७), डॉ. हसमुख नानजीभाई चौधरी (२६)हे दोघे जागीच ठार झाले. तर, कारमधील तिसरे डॉक्टर धायकल अभिजित कैलास (२८) हे गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही डॉक्टर गुजरात राज्यातील आहेत. एमबीबीएसनंतर लोणी येथे डीसीएच हे पदव्युत्तर शिक्षण येथे घेत होते. लोणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारमधील दोन मृतांसह जखमीला तातडीने रुग्णालयात हलवले.