आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केडगावात पुन्हा दोन गटांत हाणामाऱ्या, युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मागच्या आठवड्यात दोन गटांत तुफान हाणामाऱ्या झाल्यानंतर रविवारी रात्री केडगावात पुन्हा दोन गटांत मारामाऱ्या झाल्या. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. एका गटाच्या दोन युवकांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, तर दुसऱ्या गटाच्या युवकांना मारहाण करून एका हॉटेलची तोडफोड करण्यात आली. ही घटना नगर-पुणे रस्त्यावरील केडगाव वेशीजवळच्या रहेमानी हॉटेलसमाेर घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेत तीन जणांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील धोका टळला.

राजेंद्र भाऊसाहेब सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, नीलेश भाऊसाहेब सातपुते योगेश गुंजाळ यांनी हॉटेल रहेमानीसमोर गाडी लावली होती. ती काढण्यास सांगितल्याने मतीन सादिक सय्यद, मोबीन सादिक सय्यद यांनी नीलेश योगेशला दमदाटी शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी मतीन मोबीन यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा नोंदवला. तपास पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड करीत आहेत.

दुसरी फिर्याद मोबीन सादिक सय्यद (२८, केडगाव) याने दिली आहे. नीलेश भाऊसाहेब सातपुते, योगेश अशोक सातपुते तीन अनोळखी साथीदारांनी मोबीनचा भाऊ मतीन याला लोखंडी पट्टीने मारहाण करून दुकानातील सामानाची तोडफोड केली, असे त्यात म्हटले आहे. या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा नोंदवला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल डी. डी. शिंदे करत आहेत.