आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोनशे कोटींच्या निधीने शहर विकासाला मिळणार चालना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहराच्या विकासासाठी आतापर्यंतचा सर्वाधिक दोनशे कोटींपेक्षा अधिक रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अमृत योजनेतून १८२ कोटी, तर मूलभूत सुविधांच्या ४० कोटींच्या निधीतून मूलभूत सुविधांसह पाणी योजना सौर प्रकल्प, उद्याने यासाखी महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. या निधीमुळे शहर विकासाला मोठी चालना मिळणार आहे. महापौर अभिषेक कळमकर यांनी अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळात हा निधी शहरासाठी उपलब्ध करून दिला. निधी केंद्र राज्याने दिला असला, तरी त्यासाठीचा पुढाकार प्रयत्न मात्र महापौर कळमकर यांनीच केला आहे.

कळमकर यांचा पाच दिवसांचा कार्यकाळ उरला आहे, त्यानिमित्त 'दिव्य मराठी'ने त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. वर्षभरापूर्वी कळमकर यांच्या रूपाने शहराला तरुण महापौर मिळाला. डबघाईला गेलेली महापालिका, विरोधकांचे आरोप, रखडलेली कामे, कर्मचाऱ्यांचे प्रश्न असे एक ना अनेक आव्हाने कळमकर यांच्यासमोर होती. परंतु कळमकर यांनी ही आव्हाने स्वीकारत शहर विकासासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, आपल्या अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळात शहरासाठी तब्बल दोनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मिळवून दिला. केंद्रात राज्यात आमची सत्ता आहे, त्यामुळेच निधी मिळाला, त्यात कळमकर यांचे कसले श्रेय, असे आरोप विरोधकांनी केले. परंतु विरोधी पक्षात असूनही निधी खेचून आण्यासाठी कळमकर यांनी वारंवार पाठपुरावा केला. विविध योजनांचे सुधारित प्रस्ताव तयार करून, त्यांच्या मंजुरीसाठी केंद्र राज्याकडे पाठपुरावा केल्यानेच हा निधी उपलब्ध झाला. मूलभूत सुविधांच्या ४० कोटींच्या निधीवरून, तर विरोधकांनी सुडाचे राजकारण केले. मुख्यमंत्र्यांना भेटून मिळालेला निधी अडवून ठेवला. परंतु हे सुडाचे राजकारण बाजूला ठेवत आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने महापौर कळमकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन "मूलभूत'चा ४० कोटींचा निधी आणला. प्रसंगी सरकारच्या विराेधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी देखील दाखवली होती. अमृत योजनेंतर्गत नुकतीच १८२ काेटी रुपयांच्या निधीला शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. या मंजुरीसाठी देखील राज्याच्या प्रधान सचिवांकडे प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा केला. लवकरच हा निधी शहरासाठी प्राप्त होईल. त्यातून पाणी योजनेसह, सौर प्रकल्प, उद्याने, हरित पट्टे, अशी महत्त्वाची कामे मार्गी लागणार आहेत. मूलभूत सुविधांच्या १४० कामांनाही सुरुवात झाली असल्याचे कळमकर यांनी सांगितले.

नव्या महापौरांची जबाबदारी वाढली
शिवसेनेच्यासुरेखा कदम पाच दिवसांनंतर महापौरपदावर विराजमान होणार आहेत. त्यांच्याकडूनही नगरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. नुकतीच सुरुवात झालेल्या मूलभूत सुविधांच्या कामांचा दर्जा, पाणी योजना पूर्ण करणे, ठेकेदारांची मक्तेदारी मोडीत काढणे, प्रशासनात समन्वय वाढवणे, तसेच अमृत योजनेतून प्रस्तावित कामांना वेग देणे, भुयारी गटार योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणे, असे अनेक आव्हाने कदम यांच्यासमोर आहेत. त्यामुळे महापौरपदावर विराजमान होताच, कदम यांची जबाबदारी वाढणार आहे.

कळमकर यांची नैतिकता कौतुकास्पद
महापौरकळमकर यांना अवघा एका वर्षाचा कार्यकाळ मिळाला. त्यापैकी त्यांच्याकडे आता केवळ पाच दिवस उरले आहेत. शिवसेनेच्या सुरेखा कदम यांची २१ जूनला महापौर म्हणून बिनविरोध निवड झाली, परंतु त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. अशा परिस्थितीत महापौर कळमकर यांनी आपल्या दालनात स्वत:साठी वेगळी खुर्ची मांडली आहे. कदम यांची निवड झाल्यापासून ते महापौरपदाच्या खुर्चीवर बसत नाहीत. महापौरपदाच्या खुर्चीचा मान मोठा आहे, कदम यांची या पदासाठी निवड झालेली असताना मी या खुर्चीवर बसणे योग्य नसल्याचे महापौर कळमकर सांगतात. त्यांनी दाखवलेली ही नैतिकता नक्कीच कौतुकास्पद आहे, असे चित्र मनपात प्रथमच दिसले.

शहरासाठी काम केल्याचे समाधान
प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या शहरांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागते. वर्षभरापूर्वी महापौरपदाचा पदभार घेतला, त्यावेळी अनेक आव्हाने उभी होती. अमृत योजना मूलभूत सुविधांच्या कामांसह शहरातील ३२६ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेच्या मंजुरीसाठी देखील केंद्राकडे पाठपुरावा केला. या योजनेची मंजुरी देखील अंतिम टप्प्यात आले. अमृत योजनेंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सौर प्रकल्पामुळे महापालिकेचा विजेवर होणार मोठा खर्च वाचणार आहे. अभिषेक कळमकर, महापौर.
बातम्या आणखी आहेत...