आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाखांहून अधिक भाविकांचे शिर्डीत साईदर्शन, वर्षाच्या शुभारंभी लाखो भाविक साईबाबा चरणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- सरत्या वर्षाला निरोप देवून नवीन वर्षाच्या शुभारंभी, शनिवारी मध्यरात्री लाखो भाविकांनी साईबाबा मंदिर व परिसरात साईनामाच्या गजरात व  आतषबाजीत नववर्षाचे स्वागत केले. दोन लाखांहून अधिक भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेवून नववर्षाचा श्रीगणेशा केला.  

राज्याच्या व देशाच्या विविध ठिकाणांहून आलेल्या हजारो पदयात्रींनीही शिर्डी शनिवारी संध्याकाळपासून गजबजून गेली होती. भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावे यासाठी समाधी मंदीर रात्रभर उघडे ठेवण्यात आले होते. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला समाधीसमोर राहण्याच्या भाविकांच्या अट्टहासाने मंदिर व परिसरात मोठी गर्दी झाली होती. 

शनिवारी नववर्षाच्या पूर्वसंध्येला तसेच रविवारी मध्यान्ह आरतीला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी तर रात्री जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दीपक केसरकर आदींनी साईदरबारी हजेरी लावली.

देशी- विदेशी फुलांची  सजावट, रोशनाई 
२०१७ च्या स्वागतासाठी बंगळूर येथील साईभक्त बी. सी. अनिलकुमार यांच्या देणगीतून केलेली देशी- विदेशी फुलांची सजावट तसेच आकर्षक रोशनाईने साई मंदिर व परिसर ऊजळून निघाला. साईसमाधी मंदिरातही फुलांची विशेष सजावट करण्यात आली होती.   साई संस्थान विश्वस्त मंडळाने यंदा नव्यानेच सुरू केलेल्या टाईम दर्शनाने भाविकांच्या रांगा शहराबाहेर गेल्या नाहीत. टाईम स्लॉटमुळे रांगेतील प्रतीक्षा कमी झाली.
बातम्या आणखी आहेत...