आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Lacs Fifty Thousand Voters Name Not In List Says Nagar Collector

यादीत अडीच लाख मतदार नाहीत, जिल्हाधिकार्‍यांची माहिती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यातील 18 वर्षांवरील सर्वांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. मात्र, अजून अडीच लाख मतदारांची नावे यादीत आलेली नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी नुकतीच दिली.

डॉ. संजीवकुमार यांच्या हस्ते गुंडेगाव (ता. नगर) येथे लाभार्थींना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, ज्येष्ठ समाजसेवक रामराज भापकर, सरपंच संजय कोतकर, उपसरपंच सुनील भापकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार, उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील माळी, उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, तहसीलदार राजेंद्र थोटे आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. संजीवकुमार म्हणाले, सर्वसामान्य जनतेसाठी असणार्‍या शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी गरजेची आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, अन्न सुरक्षा योजना व गॅसचे अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. 18 वर्षांवरील सर्वांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. मात्र, अद्यापि अडीच लाख मतदारांची नावे आलेली नाहीत. प्रशासनाने छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. संबंधितांनी आपली नावे यादीत समाविष्ट करणे गरजेचे आहे. गोर-गरिबांना अन्नसुरक्षा कायद्यामुळे सवलतीच्या दराने धान्य मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू आहे.