आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिजयंतीनिमित्त शिंगणापुरात दोन लाख भाविकांनी घेतले शनिदेवाचे दर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासेफाटा - शनीजयंतीनिमित्त श्री क्षेत्र शनिशिंगणापुरात गुरुवारी पहाटेपासून सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनी जन्मोत्सवानिमित्त दुपारी बारा वाजता प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते महेश मांजरेकरांच्या हस्ते शनिदेवाची महाआरती करण्यात आली. ऑस्ट्रलियातील शनिभक्त राकेशकुमार, झिम्बाब्वेतील शनिभक्त जयेश शहा, मुंबई येथील भाविक आदी याप्रसंगी चौथऱ्यावर आरतीसाठी उपस्थित होते.
 
शनी जयंतीनिमित्त पहाटेपासूनच शनिभक्तंाची दर्शनरांगेत गर्दी वाढत होती. शनिदेवाचा चौथरा परिसरात शनी जयंतीमुळे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी ते ११ या वेळेत ज्ञानेश्वर तांबे महाराजांचे कीर्तन झाले. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीने आलेल्या कावडींच्या काशी प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगाजलाने सकाळी अकरा वाजता शनिदेवास जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर शनिदेवास मुकुट आणि वस्त्र चढवण्यात आल्यानंतर अभिषेक, महापूजा महाआरती करण्यात आली. जनकल्याणप्रीत्यर्थ महायज्ञ सोहळाही पार पडला. शनैश्वर देवस्थानच्या रुग्णालयात मोफत रोगनिदान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. सायंकाळी भजन संध्याचा कार्यक्रम झाला. शुक्रवारी सकाळी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वाटप करून शनी जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे.
 
देवस्थान समितीच्या वतीने शनी जयंती महोत्सवात कीर्तनमहोत्सवही पार पडला. गुरुवारी सायंकाळपर्यंत भाविकांच्या गर्दीने शिंगणापूरचे रस्ते फुलून गेले होते. देवस्थानच्या वतीने संस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे, उपाध्यक्ष नानासाहेब बानकर यांनी दिवसभरात आलेल्या प्रमुख शनिभक्त अतिथींच्या सन्मान केला.

शनी जयंतीनिमित्त गुरुवारी देशभरातील हजारो भाविकांनी श्री क्षेत्र शनिशिंगणापूरला येऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. शनी देवाला अभिषेक करण्यासाठीही भाविकांची रिघ लागली हाेती.

११ क्विंटल साखरेचे लाडू वाटप
देवस्थानच्या वतीने भाविकांना ११ क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू पाकिटांतून वाटप करण्यात आले. महाआरतीनंतर ते १० हजार भाविकांनी महाप्रसाद घेतला. सर्वरोगनिदान शिबिरात ७५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. मुंबईतील शनिभक्तांकडून सकाळी नाष्टा भोजन प्रसाद वाटप करण्यात आला. देवस्थान न्यासाच्या ४५० कामगारांना मुंबईतील रामेश्वर सोनी यांच्याकडून पोशाखांचे वाटप करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...