आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुरडा, जेवण फसलेले मनोमिलन: खासदार लोखंडे पालकमंत्री शिंदे यांच्यातील दुरावा कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दोन्ही नेते कर्जत-जामखेड मतदारसंघातील दिग्गज. त्यांच्या मनोमिलनासाठी कर्जतमधील नेत्याने जंगी हुरडा पार्टी सामीष जेवणाचा घाट घातला. पाच-सहा बोकड ‘शहीद’ झाले. दोन हजार कार्यकर्त्यांचा फौजफाटाही जमला. दोन्ही नेतेही तेथे आले. त्यांनी जोरदार भाषणे केली. शेजारी बसले, मात्र त्यांच्यात मनोमिलन राहूनच गेले. मंगळवारी रात्री हे घडले. त्यावेळी जेवणात असलेल्या कर्जतच्या शिपी आमटीच्या खास चवीइतकीच ‘मसालेदार’ चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे या दोघांत नाते गुरू-शिष्याचे. शिंदेंनी त्याचा जाहीर कार्यक्रमात स्वत:च उल्लेख केला आहे. लोखंडे कर्जत-जामखेड मतदारसंघात १५ वर्षे भाजपचे आमदार होते. त्यावेळी शिंदे त्यांचे खंदे कार्यकर्ते होते. ते सावलीसारखे त्यांच्याबरोबर असत. राजकारणाचे बारकावे ते तेव्हाच शिकले. लोखंडे यांच्यामुळेच राम शिंदे यांच्या पत्नी आशा जामखेड पंचायत समितीच्या सभापती झाल्या होत्या. त्याच काळात राम शिंदे यांची आमदारकीसाठी उमेदवारी प्रबळ झाली.

सन २००९ मध्ये हा मतदारसंघ खुला झाल्यावर लोखंडे मुंबईतून विधानसभा लढले पराभूत झाले. दरम्यान, राम शिंदे भाजपकडून कर्जत-जामखेडमध्ये आमदार झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लोखंडे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून शिर्डीत उमेदवारी मिळवली. ते खासदारही झाले. त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती फिसकटली. त्यावेळी राम शिंदे भाजपकडून, तर शिवसेनेकडून रमेश खाडे उभे होते. १५ वर्षे आमदार असल्याने खासदार लोखंडेंचा दबदबा पाहून त्यांना खाडेंच्या प्रचारात जुंपण्यात आले. ते शिवसेनेचे खासदार असल्याने त्यांना ते करावेच लागले. आपल्याच शिष्याच्या विरोधात त्यांनी केलेल्या प्रचारामुळे शिंदे दुखावले. ते निवडून आले राज्यमंत्रिपदाबरोबरच पालकमंत्रीही झाले.

लोखंडे शिंदे यांच्यातील मतभेदाची कर्जत जामखेड तालुक्यात जोरदार चर्चा सुरू असते. अनेकांनी त्यांच्यात ‘सुलह’ घडवण्याचा प्रयत्नही करून पाहिला, मात्र ते घडले नाही. दोघांची तोंडे दोन दिशेला राहिली. कर्जतचे माजी सरपंच भाजपचे सध्याचे जिल्‍हा सरचिटणीस नामदेव राऊत हेही लोखंडेंचे राम शिंदेंइतकेच जवळचे. तसे ते दोघांच्याही जवळचे. ते पूर्वी शिवसेनेत होते. आता भाजपमध्ये आहेत. या दोन नेत्यांचे मनोमिलन घडवण्यासाठी त्यांनी कर्जतजवळच्या दूरगाव येथे त्यांच्या शेतावर बुधवारी हुरडा पार्टी सामीष जेवणाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे लोखंडे शिंदेंबरोबरच सर्वपक्षीय नेत्यांना कार्यकर्त्यांना निमंत्रण होते. शिंदे लवकर, तर लोखंडे थोडे उशिरा तेथे पोहोचले. त्यानंतर सत्कार सोहळा झाला. स्वागत करतानाच नामदेव राऊत यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. त्यांनी या दोन नेत्यांच्या मनोमिलनाला ‘नद्याजोड प्रकल्प’ असे नावही दिले. त्यांचे खुमासदार शैलीतील भाषण कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळवून गेले.

लोखंडेंचा पुढाकार
त्यानंतरबोलताना खासदार लोखंडे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेने केलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राम शिंदे नामदेव राऊत यांचा त्यांनी अनेकदा उल्लेखही केला. त्यावेळी त्यांनी खुल्या मनाने दोन पावले पुढे येत त्यांच्यात शिंदे यांच्यात जे काही झाले, ते दूर करू, असे मनोमिलनाचे संकेतही दिले.

शिंदेंचामात्र नकार
त्यानंतरराम शिंदे यांनी मात्र फक्त एकदा औपचारिकपणे लोखंडे यांचा उल्लेख केला. त्यानंतर मात्र त्यांनी फक्त आपल्या मतदारसंघात कोणती विकासकामे होणार आहेत, याची जंत्री सांगितली. त्यांचे भाषण पूर्णपणे प्रचारकी थाटाचे राहिले. लोखंडे यांनी मतभेद मिटवण्याची तयारी केली होती, पण त्याबद्दल एक अवाक्षरही शिंदे यांनी काढले नाही.