आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीवर अत्याचार; पाथर्डीत गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - तालुक्यातील फुंदे टाकळी येथील एका तरुणीवर घाटशिळ पारगाव (ता. शिरुर कासार, जि. बीड) येथील दोन जणांनी पळवून नेऊन अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर दोघांनी पिडित तरुणीस जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडित तरुणीने शनिवारी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सोमवारी (२ फेब्रुवारी) सायंकाळी ७.३० च्या सुमारास महादेव खेडकर व प्रशांत उर्फ राजेंद्र आव्हाड (घाटशिळ पारगाव) या दोघांनी पीडित तरुणीस इंडिका कारमधून पळवून नेले. राष्ट्रीय महामार्गावरील शेकटे फाट्याजवळ या तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिस ठाण्यात आरोपी खेडकर व आव्हाड यांच्या विरोधात भादवि कलम ३६३,३६६,३७६ (ड) १०९, ११४ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप पारेकर हे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...