आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल दोन महिन्यांनंतर भीज पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दोनमहिन्यांच्या विश्रांतीनंतर मंगळवार पहाटेपासून पावसाचे नगर शहरात पुनरागमन झाले. दिवसभर भीजपाऊस सुरू होता. या पावसामुळे खरिपाच्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

यंदा नगर जिल्ह्यात जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. तथापि, १५ जूननंतर पाऊस थांबला. जूनच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या झाल्या. उगवण झाली, पण नंतर पाऊस गायब झाला. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. तब्बल दोन महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे उर्वरित पेरण्या लांबणीवर पडल्या. आतापर्यंत लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी दीड लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहेत.पावसाने दडी मारल्यामुळे अनेक भागात मूग, सोयाबीन, उडीद, मका यासह अन्य पिकांची वाढ खुंटली होती.त्याचबरोबर काही भागात पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांवर नांगर फिरवून दुबार पेरणीला सुरुवात केली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने कृषी बाजारपेठेतील उलाढालही ठप्प झाली होती. खरिपासाठी व्यापारी वर्गाने लाखो रुपये गुंतवून बी-बियाणे खते खरेदी केली होती. मात्र, पाऊस नसल्यामुळे हा माल दुकानांमध्येच पडून होता.

पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीवर्ग हवालदिल झाला होता. मंगळवार नगर शहर, केडगाव, भिगार, सावेडी, नागापूर यासह नगर तालुक्यातील जेऊर, रुईछत्तीसी, कापूरवाडी, चास, वाळकी, चिचोंडी पाटील या भागात दिवसभर संततधार सुरू होती. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत १४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद अकोले तालुक्यात (५२३ िमलिमीटर) झाली. पाथर्डी तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत अकोले १, कोपरगाव ४, राहाता ५, श्रीरामपूर ८, राहुरी ६.२, नेवासे १२, नगर ४, शेवगाव १४.६, पाथर्डी २, कर्जत ३, श्रीगोंदे जामखेडमध्ये ३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्हा प्रशासनाने येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून, नगर महापालिका, सर्व नगरपालिका, नगरपरिषदा यांना सतर्क राहण्याचे आदेश आपत्ती विभागाने दिले आहेत.

नगर शहरात बुधवारी पहाटेपासून रिमझिम पाऊस सुरू झाला. पावसाला फारसा जोर नसला तरी शहरात जागोजागी पाण्याची तळी साचली होती. साचलेल्या तळ्यातून गाडी नेल्याने पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे अन्य वाहनचालकांना तसेच शेजारून जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. छाया: कल्पक हतवळणे / उदय जोशी.

५२३
अकोले
८९
संगमनेर
७८
कोपरगाव
८१
श्रीरामपूर
८१
राहुरी
१५५
नेवासे
१५३
राहाता
१७०
नगर
१६२
शेवगाव
६२
पाथर्डी
१२७
पारनेर
९६
कर्जत
८४
श्रीगोंदे
१४९
जामखेड
टँकर घटणार
जिल्ह्यातपावसाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे येत्या काही दिवसांत टँकरची संख्या कमी होणार आहे. सध्या नगर जिल्ह्यात सहा लाख नागरिकांना ३५२ टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

पाणीसाठ्यात वाढ
भंडारदरामुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. भंडारदरा ७२, मुळा ४६.५०, निळवंडे ६६.०४, आढळा ६७.१७, मांडआेहोळ ६.९२, घोड २४.४७ टक्के साठा झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...