आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: बनावट दारुकांडातील मृतांची संख्या 11 वर, काहींची प्रकृती अजुनही चिंताजनक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- जेऊर गटातील पांगरमल गावात बनावट दारुकांडातील मृत्यूचे तांडव थांबण्याची नाव घेत नाही आहे. बनावट दारुकांडातील मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. मंगळवारी पुन्हा दोघा अत्यवस्थ रुग्णांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. अजूनही 10 जणांवर उपचार सुरु असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

पांगरमलच्या भास्कर आव्हाड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी त्यांचे निधन झाले, तर कौडगावला नरेंद्र चकले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील तीन दिवसापासून चकले अत्यावस्थ होते. यापूर्वी बनावट दारुने बाळासाहेब मदगे यांचा बळी घेतला होता. कौडगावात शोकाकुल वातावरण आहे. मात्र, पोलिसांत याबाबत कोणतीही नोंद नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...नेमके काय आहे प्रकरण? चौकशीचे धागेदोरे थेट अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयापर्यंत...रुग्णालयातील कँटीनमध्ये बनावट दारूचा कारखाना

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...