आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओबीसी नेतृत्वासाठी दोन्ही मुंडेमध्ये चुरस, भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये व्यूहरचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेचे सर्वाधिक माळी समाजात उमटले. ओबीसींचे नेतृत्व मिळवण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवान हालचाली सुरू असून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या दोन्हींच्या मागे त्यांच्या पक्षाची ताकद एकवटण्याची प्रक्रिया सुरू झाली.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी नेतृत्वाची विशेषत: राज्यातील वंजारी, माळी, धनगर या समाजाची सहानुभूती पंकजा यांच्याभोवती वाढली. पंकजांना नेतृत्व करू द्यायचे नाही, असे डावपेच भाजपसह अन्य पक्षातून सुरू झाले. त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणा दाखवत पुण्याचा माळी समाजाचा मेळावा यशस्वी करून दाखवत सावता परिषदेचे सदस्यत्व स्वीकारले. गोपीनाथ मुंडे असते, तर त्यांनी भुजबळांना या प्रकरणातून अलगद वाचवले असते, अशी माळी समाजातील कार्यकर्त्यांची भावना आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपर्यंत ओबीसींचा नेता म्हणून धनंजय मुंडे यांना राजकीय वर्तुळात पुढे करण्यासाठीच्या हालचालींना सर्वच छोटे समाज जागृत झाले आहेत. ओबीसींच्या नेतृत्वासाठी धनंजय मुंडे यांना भाजप किंवा शिवसेनेत धाव घ्यावी लागेल. याचे मुख्य कारणही भुजबळ प्रकरणातून गेल्या वर्षभरापासून माळी समाजाची राष्ट्रवादीबरोबरची भावनिक बांधिलकी हळूहळू संपुष्टात येत आहे. माळी समाज वगळता ओबीसींचे नेतृत्व होऊ शकत नाही, याची जाणीव धनंजय मुंडे यांना आहे. राष्ट्रवादीला रोखायचे असेल, तर वंजारी समाजाची भक्कम ताकद मागे असलेल्या पंकजा मुंडे यांना पुढे करण्याची गरज नेतृत्वाच्या लक्षात आली. मागील आठवड्यात पंकजा यांनी दोन दिवस गल्ली दौरा केला. ओबीसींचे संघटन करून भुजबळ यांनी पक्षावरही कायम दबदबा ठेवला. तशी प्रेरणा गोपीनाथ मुंडेंकडून घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस वगळता प्रमुख पक्षांकडे वलय असलेल्या नेत्यांची वानवा आहे. राष्ट्रवादीला माळी, धनगर वंजारी स्वीकारतील याची खात्री खुद्द नेत्यांनाच नाही.
भगवानगडाच्या माध्यमातून संघटीत झालेला वंजारी समाज तीन महिन्यांपासून अस्वस्थ आहे. महंत नामदेशास्त्री यांनी पंकजा मुंडे यांची अचानक बॉम्ब टाकून अडचण केली. भगवानगड मेळावा रद्द व्हावा म्हणून विविध पक्षांनी सक्रीय होण्यामागे सुद्धा ओबीसी संघटन हाच मुख्य मुद्दा आहे. पंकजा यांना गडावरून अपमानित होऊन जावे लागल्यानंतर गडावर मेळावा घ्यावा, असा समाजाचा दबाव पंकजा यांच्यावर वाढला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही भगवानगडाशी संपर्क वाढवला.

पंकजांनी चळवळीचे नेतृत्व करावे
पंकजामुंडे यांचा सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांशी अत्यंत चांगले संबंध असून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पंकजा यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी पक्षाकडून सोपवली जाऊ शकते. ओबीसी समाज ही भाजपची मोठी ताकद आहे. पंकजा यांनी अशा चळवळीचे नेतृत्व करावे, अशी सर्व समाज घटकांची भावना आहे. अमोल गर्जे, भाजयुमो,तालुकाध्यक्ष.

पंकजात ओबींसीचे नेतृत्व करण्याची क्षमता
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठीशी वंजारी समाजाची सर्व ताकद असून भगवानगडावर दसरा मेळावा सर्व ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे. ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची क्षमता महिला बालकल्याण, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात आहे. अन्य नेत्यांच्या नेतृत्वाविषयी एकमत होऊ शकणार नाही. संभाजी पालवे, सभापती,पंचायत समिती.
बातम्या आणखी आहेत...