आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अधिकाऱ्यांना चार तास कोंडले: महापालिकेच्या ढिम्म कारभाराचा निषेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- प्रभागएकमधील पथदिव्यांसह इतर प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराच्या निषेधार्थ शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिगंबर ढवण यांनी मंगळवारी महापालिकेच्या सावेडी प्रभाग कार्यालयात दोन अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत सुटका नाही, अशी भूमिका ढवण यांनी घेतली. तब्बल चार तासांनंतर प्रशासनाकडून समाधानकारक लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ढवण यांनी आंदोलन मागे घेतले.
प्रभाग एकमधील पथदिव्यांची अनेक कामे प्रलंबित आहेत. साठ ते सत्तर पथदिवे बंद असल्याने पवननगर, जयभवानी नगर, ढवण वस्ती, लेखानगर, तपोवन हडको, कादंबरी नगरी, गावडे मळा आदी परिसरात रात्री अंधार असतो. त्यामुळे या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नगरसेविका शारदा ढवण यांनी प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मनपाशी पत्रव्यवहार केला. त्यांनी पथदिव्यांचा प्रश्न मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला, पण दखल घेतली जात नसल्याने दिगंबर ढवण यांनी आंदोलनाचा मार्ग निवडला.

यापूर्वी मार्च २०१५ मध्ये आंदोलन करून ढवण यांनी हा विषय मांडला होता. त्यावेळी विद्युतीकरणाची कामे पूर्ण करून २५० ट्यूब बसवण्यात येतील, असे आश्वासन प्रशासनाने दिले होते. पण या आश्वासनाची अंमलबजावणी झाली नसल्याने मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ढवण यांनी मनपाच्या सावेडी प्रभाग कार्यालयात आंदोलन सुरू केले. विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब सावळे सुपरवायझर पांडुरंग शेंडगे यांना कार्यालयात कोंडण्यात आले. प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी यांनी कार्यालयात येऊन कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, पण ढवण यांनी जोपर्यंत आयुक्त येणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर तडवी निघून गेले. अधिकाऱ्यांना कोंडल्याची माहिती समजल्यानंतर दोनच्या सुमारास पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र गर्गे यांनी कार्यालयात येऊन ढवण यांची भेट घेऊन चर्चा केली. ढवण म्हणाले, मनपाच्या अधिकाऱ्यांनी येथे येऊन माझ्याशी चर्चा करावी, माझे म्हणणे ऐकूण घ्यावे; अन्यथा मी आंदोलन सुरूच ठेवेन. पत्रव्यवहार करूनही कामे मार्गी लागत नसल्याने दुसरा मार्ग उरलेला नाही. यावर सावळे म्हणाले, पथदिवे बंदची तक्रार आमच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेली आहे. तीन दिवसांत कामे मार्गी लावू. आयुक्तांना येता येणार नाहीत, ते बाहेर आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावर ढवण म्हणाले, मी जनतेसाठी भांडतो आहे. हवे तर माझ्यावर कारवाई करा. त्यानंतर तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश मोरे यांनी ढवण यांची भेट घेतली. अखेर सावळे यांनी प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनामुळे तब्बल चार तास अधिकाऱ्यांना बंद दालनात थांबावे लागले.

यामागण्या झाल्या मान्य
प्रभागएकमधील बंद पथदिवे तीन दिवसांत बसवण्यात येतील, प्रभागासाठी सय्यद अब्दुल या वायरमनची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात येईल, विद्युतीकरणाचे काम निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करण्यात येईल, लोकसहभागातून उपलब्ध केलेल्या २५० ट्यूब बसवण्यात येतील.
नगर शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील पथदिव्यांचे प्रलंबित काम त्वरित पूर्ण करावे, या मागणीसाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांनी सावेडीतील प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी यांच्या दालनात विद्युत विभागप्रमुख बी. सी. सावळे, पांडुरंग शेंडगे यांना कोंडले. स्वत: ढवण त्यांच्याबरोबर आत बसले होते.

माझ्यावर कारवाई करा
पोलिसांनीमध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण आयुक्त आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. हवे तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, अशी भूमिका ढवण यांनी घेतल्यामुळे तोडगा निघत नव्हता.
कार्यकर्ता बरोबरच...
दिगंबरढवण यांनी अधिकाऱ्यांना सावेडी प्रभाग कार्यालयात कोंडले होते. अधिकाऱ्यांना लघुशंकेसाठी बाहेर जाऊ देण्यात आले. तथापि, ढवण यांचा कार्यकर्ता त्यांच्याबरोबरच होता.

लोकसहभागातून ट्यूब
प्रभागातीलबंद पथदिवे दुरुस्त करून ट्यूब बसवण्यासाठी नागरिकांनी २५० ट्यूब महापालिकेला उपलब्ध करून दिल्या. त्यांची किंमत सुमारे सव्वा लाख रुपये आहे. तथापि, या ट्यूब बसवण्याचे आैदार्यदेखील प्रशासनाने दाखवले नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

तांत्रिक कारणाने विलंब
प्रभागातीलपथदिव्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सर्व्हे केला असून त्यासाठी सुमारे साडेअठरा लाख खर्च अपेक्षित आहे. निधी उपलब्ध नव्हता. नंतर नगरसेवकांच्या साडेचार लाख रुपये निधीला मंजुरी मिळाली. कामासाठी निविदा मागवल्या, पण प्रतिसाद मिळाला नाही. फेरनिविदा मागवल्या आहेत, पण त्याला अजून प्रतिसाद नाही. निविदा मंजूर झाल्यानंतरच पुढील काम मार्गी लागेल, अशी माहिती विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब साळवे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
यापूर्वीमार्च २०१५ मध्ये आंदोलन केले होते. तेव्हा मला लेखी आश्वासन दिले गेले, पण आजतागायत प्रश्न सुटलेला नाही. प्रभागातील कामांसाठी १८ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित होता. नंतर प्रशासनाशी चर्चा केली, त्यावेळी निधी लाख ५० हजारांवर आला. पण तेवढाही निधी नसल्याने नगरसेवक निधीतून लाख ५० हजारांचा निधी मंजूर केला, तरीही प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे आंदोलनाची भूमिका घेतली. मुदतीत प्रश्न सुटले नाही, तर आयुक्तांच्या दालनात उपोषण करेन.'' दिगंबरढवण, उपशहरप्रमुख,शिवसेना.
बातम्या आणखी आहेत...