आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालिकेच्या २ उमेदवारांत मनमाडमध्ये हाणामारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाड - नगरपालिका निवडणुकीची प्रचार मोहीम अंतिम टप्प्यात असताना मनमाडमध्ये दाेन उमेदवारांमध्ये मागील वादातून बुधवारी सकाळी तुंबळ हाणामारी झाली. यात विद्यमान नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग एकमधील उमेदवार योगेश ऊर्फ बबलू दिलीप पाटील, त्यांचे सहकारी गणेश निंबाळकर व प्रभाग २ अ मधील अपक्ष उमेदवार तथा माजी नगरसेवक रफिक शेख हे जखमी झाले अाहेत. याप्रकरणी पाेलिसांनी परस्परविराेधी तक्रारीवरून दाेन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून तिघांना ताब्यात घेण्यात अाले. दाेन जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.

मंगळवारी रात्री इंदिरानगर भागातील देशमुख परिवारातील एका महिलेचे निधन झाले हाेते. त्यामुळे देशमुखांच्या सांत्वनासाठी माजी नगरसेवक रफिक शेख त्यांच्या घरी गेले होते. त्याच वेळी मागील वादाची कुरापत काढून शेख व पाटील समर्थकांत वाद झाला. पोलिसांनी या घटनेप्रकरणी रफिक शेख यांच्या फिर्यादीवरून तक्रार नोंदवून घेतली व शेख व पाटील यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून वाद मिटवला हाेता. बुधवारी सकाळी पुन्हा या वादाची ठिणगी पडली. एका अंत्ययात्रेसाठी गेलेल्या या दोघांमध्ये स्मशानभूमीतच वाद झाला आणि अंत्यविधीनंतर स्मशानभूमी रस्त्यावरच शेख व पाटील यांच्यात हाणामारी झाली.

यात योगेश ऊर्फ बबलू पाटील व गणेश निंबाळकर हेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी रफिक शेख, हसन शेख व लतीफ शेख या तिघांविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला अाहे. दरम्यान, माजी नगरसेवक रफिक शेख यांनी स्वतंत्र फिर्याद दिली असून त्यात माजी नगराध्यक्ष योगेश पाटील व इतरांनी मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण केल्याचे नमूद केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...